शिक्षक दिनानिमित्त पाटोद्यात शिक्षकांचा गौरव !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिक्षक दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Patoda honors teachers on the occasion of Teacher's Day

पाटोद्याचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण यांच्या पुढाकारातून शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक बी.एल. तोरडमल, बी. के. खंडागळे, व्ही एस पोंदे, सी. बी. बनकर, यु. एस. पाटील, एस. एस. वस्तारे, एस.एम मार्कंडे, ए. के. शिंदे, आर. पी. जमदाडे, सी. झेड. भैलुमे या शिक्षकांचा गौरव करत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विश्वनाथ मोरे, प्रकाश कडू पाटील, सोहेल सय्यद, रौफ पठाण, सिद्दिक शेख, रमजान सय्यद, जिबरान शेख, सुफियान पठाण,सादत पठाण, साहिल पठाण,अर्शद पठाण,अरबाज सय्यद सह आदी उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. पठाण यांच्यासह गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानाने शिक्षक भारावून गेले होते.