PM Kisan Yojana : ई-केवायसी करूनही तुमच्या खात्यात पीएम किसानचा बारावा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर कॉल करा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । PM Kisan Samman Nidhi Yojana 12th Installment 2022 । दिवाळीपूर्वी सोमवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) दोन हजार रुपयांचा 12 वा हप्ता देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचला आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या खात्यात पैैसे जमा झालेले एसएमएस (SMS) देखील मिळाले आहेत. परंतु ई – केवायसी करूनही ज्या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांनी नेमका कुठे संपर्क साधायचा? चला तर मग जाणून घेऊयात!
गेल्या अनेक दिवसांपासून 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16000 कोटी रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे पीएम किसान सन्मान संमेलन 2022 (PM Kisan Samman) या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा निधी हस्तांतरित केला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 16,000 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे 2000-2000 रुपयांच्या स्वरूपात पाठवण्यात आली आहे. ई-केवायसी आणि प्रत्यक्ष पडताळणीमुळे ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता उशीरा येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 3 समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. पीएम-किसान (PM-KISAN) अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 2 लाख कोटींची मदत देण्यात आली आहे.
जर अजूनही तुम्हाला मेसेज आला नसल्यास, तुमचे बँक खाते तपासा.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांच्या खात्यावर पैसे पोहचलेले नाहीत.ई – केवायसी करूनही ज्या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी.
या नंबरवर कॉल करा
- पीएम किसान टोल फ्री क्रमांक:18001155266
- पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
- पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011 – 23381092, 23382401
- पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
- पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120 – 6025109
- ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in