Pink WhatsApp :  व्हॉट्सअप गुलाबी रंगात बदलण्याचा दावा करणाऱ्या लिंकपासून सावधान अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल,पिंक व्हाॅट्सअपचं नेमकं सत्य काय? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून पिंक व्हाट्सअपची (Pink  WhatsApp) चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. पिक व्हाट्सअपच्या (Pink WhatsApp Link) लिंक वाॅटसअप ग्रुपवर शेअर होत आहेत.आपल्या ओळखीतल्या माणसा कडून लिंक शेअर झाल्याचे पाहताच अनेक जण या लिंकला क्लिक करत आहेत.क्लिक केल्यानंतर पुन्हा तशीच लिंक वाॅटसअप ग्रुपवर नव्या माणसांकडून शेअर होताना दिसत आहे. यामुळे वाॅटसअपधारक पिंक वाॅटसअप मॅसेजच्या भडिमाराने पुरते वैतागून गेले आहेत. परंतू अश्या गोष्टी नेमक्या कश्यामुळे होत आहेत? पिंक व्हाॅट्सअपचं नेमकं सत्य आहे हे जाणून घेऊयात.

Pink WhatsApp, Beware of links that claim to turn WhatsApp pink, If you click on the link these disadvantages will happen, what is the real truth of Pink WhatsApp? Know in detail

पिंक व्हाॅट्सअप विषयी ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर तथा Cyber Awareness Foundation Maharashtra चे Head member डाॅ धनंजय देशपांडे (DD) यांनी फेसबुक पोस्ट करत यासंदर्भात महत्वाची माहिती जारी केली. डाॅ धनंजय देशपांडे (डीडी) यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजकाल अनेकांना व्हाट्स अप वर मेसेज येत आहेत की, व्हाट्स अप चे नवीन व्हर्जन आले असून तुमचे व्हर्जन अपडेट करा त्यानंतर तुमच्या व्हाट्स अप चा रंग गुलाबी (आकर्षक) असा होईल तसेच इतरही अनेक फीचर्स त्यात आहेत त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि असे सांगत पुढं जाऊन ते लोक असेही भासवतात की हि व्हाट्स अप ची ऑफिशियल वेब वरून पाठवलेली लिंक व मेसेज आहे त्यामुळे काळजी करू नये ! फक्त सोबतच्या लिंक ला क्लिक करून पुढील प्रोसिजर पूर्ण करा”

आणि तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुमचा व्हाट्स अप पिंक बिंक काय होत नाही मात्र तुमचा मोबाईल हॅक होतो आणि तुमचा डेटा चोरीला जातो. आता डेटा चोरीला जाणे म्हणजे काय ? हे टेक्नोसॅव्ही लोकांना कळेल पण सामान्य लोकांसाठी सांगतोय की, डेटा म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये जे जे काही साठवले असेल ते ते सगळे चोरीला जाते. गॅलरीमधील फोटो, कुणाबरोबर केलेले चॅटिंग, बँकिंग डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर लिस्ट असं सगळं सगळं चोरीला गेल्यावर काय धोका होऊ शकतो हे लक्षात आलंच असेल.

तुमचे फोटो वापरून (मॉर्फिंग करून) नंतर तुम्हालाच ब्लॅकमेल केलं जाऊ शकत. तुमच्या चॅटिंग मधील काही चॅट अर्धवट असे कट घेऊन तुम्हालाच नंतर घाबरवलं जातं. कारण भावनेच्या भरात कधीकधी आपण बरेच काही मित्राजवळ / मैत्रिणीजवळ बोलून गेलेलो असतो ते सगळं अशा हॅकर साठी जणू पुरणपोळी असते. त्याद्वारे ते तुम्हाला लुटू शकतात. आणि अजून एक म्हणजे, हल्ली टेलिमाकेर्टिंगसाठी कंपन्यांना अधिकाधिक मोबाईल नंबर्स हवे असतात. मग हॅकर्स तुमच्या मोबाईलमधील नंबर कंपन्यांना विकतात. त्यामुळे सर्वांनी pink WhatsApp च्या भूलभूलैयापासून सावध रहावे. कोणतीही लिंक क्लिक कर नये, असे अवाहन डाॅ धनंजय देशपांडे यांनी केले आहे.

आजकाल लोकांना सतत काहीतरी नवीन हवं असत. सतत डीपी बदलणे, स्क्रीन सेव्हर बदलणे, इतकंच काय पण मोबाईलचे कव्हर सुद्धा बदलणे हे अनेकजण करतात ! हीच मानसिकता ओळखून हॅकर्स लोकांनी आता हा नवीन सापळा रचला आहे. नाविन्याची हौस असावी पण ती इतकीही नसावी की आपणच गोत्यात यावे. त्यामुळे पिंक व्हाॅट्सअप पासून सावध रहावे, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

तुमच्या फोनवर गुलाबी रंगाच्या व्हाट्सअप (Whatsapp update) अपडेटसाठी आलेली फेक लिंक (Fake link) व्हायरस (virus) असू शकते. सायबर तज्ञांनी लिंकद्वारे फोनवर पाठवण्यात येणाऱ्या या लिंकविषयी सावध केले आहे. सायबर सुरक्षा तज्ञांनुसार व्हाट्सअप अपडेटसाठी तुमच्या मोबाईल (Mobile virus) वर एक लिंक पाठवण्यात येते. या लिंकद्वारे व्हाट्सअप अपडेट केल्यास ते गुलाबी (whatsapp pink) रंगाचे दिसेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा मोबाईल हॅक होईल आणि तुम्ही व्हॉट्सअपचा वापर करू शकणार नाही.

व्हाट्सअप पिंक नावाने आलेल्या लिंकवर क्लिक करू नका

सायबर सुरक्षा तज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावरून याविषयी सावध केले आहे. एपीके डाऊनलोड लिंकसह व्हॉट्सअप (WhatsApp) ग्रुप व्हायरस (WhatsApp group virus) पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन वापणे अवघड होईल. तसचे, सायबर सुरक्षा (Cyber Security) संबंधित वोयागेर इन्फोसिस कंपनीचे संचालक जितेन जैन यांनी देखील या लिंकविषयी सावध केले आहे. तसेच, गुगल किंवा ॲप्पलच्या अधिकृत ॲपस्टोअरशिवाय एपीके किंवा अन्य मोबाईल ॲप इन्स्टॉल करू नये असा सल्ला दिला आहे.

व्हाट्सअपकडून युजर्सना सतर्क राहण्याचे आवाहन

व्हाट्सअपने देखील अशा लिंकबाबत युजर्सनी सतर्क रहावे असे आवाहन (WhatsApp appeals to users to be vigilant) केले आहे. एखादा संशयास्पद मेसेज किंवा ई-मेल आल्यास त्याला उत्तर देण्यापूर्वी संपूर्ण तपासून घेण्याचा सल्ला व्हाट्सअपकडून देण्यात आला आहे.

सावध राहा… सतर्क राहा

व्हाट्स अप तर्फे अधिकृत असं काहीही पिंक व्हर्जन आलेलं नाहीय. त्यामुळे असं कुणी मेसेज करून कळवत असेल तर त्याला एन्टरटेन करू नका. थेट ब्लॉक करा आणि त्या नंबरची तक्रार त्वरित १९३० या नम्बरवर करा. तसेच समजा तुमच्याच एखाद्या मित्राकडून असा मेसेज आला असेल तर त्यालाही सावध करा. कारण असा मेसेज मित्राकडून जर आला असेल तर मग त्याचा फोन ऑल रेडी हॅक झालेला असतो. त्यामुळे त्यालाही सावध करा. सावध राहा… सतर्क राहा असे अवाहन डाॅ धनंजय देशपांडे  (Dr. Dhananjay Deshapande ) यांनी केले आहे.