Anil Ramod Case : अनिल रामोड प्रकरणात महसुल विभागातील तीन डझन अधिकारी सीबीआयच्या रडारवर

पुणे : 8 लाख रूपयांच्या लाचखोरीत सीबीआयने (CBI) अटक केलेले अतिरिक्त महसुल विभागीय आयुक्त अनिल रामोड (Anil Ramod) यांच्यावरील कारवाईमुळे पुणे महसुल विभागातील (Revenue Department Pune) अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रामोड यांच्याशी संबंधित तीन डझन अधिकारी सीबीआयच्या रडारवर आले आहेत. सीबीआयने अनिल रामोड प्रकरणात सखोल चौकशी हाती घेतली आहे, अशी माहिती आता समोर येत आहे.

Anil Ramod, Three dozen revenue officials on CBI's radar in Anil Ramod case, Anil Ramod latest news today,

या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड (Anil Ramod News) यांची सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्याच्या प्रकरणात लवाद म्हणून नियुक्ती केली होती. सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रकरणे रामोड यांच्याकडे देण्यात आली होती.रामोड यांच्याकडे पाच जिल्ह्यांचा कारभार देण्यात आला होता.रामोड यांनी आजवर केलेल्या व्यवहारांची कामकाजाची तसेच फायलींची पडताळणी सीबीआय करणार आहे.

फाईलचा प्रवास हा छोट्या कार्यालयापासून आयुक्त कार्यालयापर्यंत असतो. आयु्क्त कार्यालयातून अनेक फाईल्स मंत्रालयात जातात. मंत्रालयात या फाईल्सचे भवितव्य ठरत असते. रामोड यांच्याकडे महामार्ग आणि रेल्वेल्या भूसंपादनासंदर्भातील प्रकरणांची जबाबदारी देण्यात आली होती. यात भूसंपादन करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात करोडो रुपये दिले जातात.या कामात अधिकार्‍यांकडून या संदर्भातील फाईल्स त्यांच्यापर्यंत येत असल्याने या फाइल्सच्या शोध सीबीआयने सुरू केला आहे.(Anil Ramod CBI)

यासोबतच रामोड यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सहा कोटी रूपयांची रक्कम रामोड यांच्याकडे कोणामार्फत गेली याचाही शोध सीबीआयने सुरू केला आहे. एवढी रोख रक्कम एकाच कामातून तर मिळालेली नाही. मग ती कितीजणांकडून मिळाली. यात कुणाकुणाचे हात ओले झाले, याचाही सीबीआय’ने शोध सुरु केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने म्हटलं आहे. (Maharashtra Politics)