Shirdi Latest News :  शिर्डीकरांसाठी राज्य सरकारची मोठी भेट, शिर्डीत होणार अपर जिल्ह्याधिकारी कार्यालय – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीला अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.सरकारने शिर्डीकरांसाठी ही मोठी भेट दिली असल्याचे बोलले जात आहे.शिर्डी बरोबरच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथेही अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

Shirdi latest news, state government's big gift for Shirdi people, Additional District Magistrate's office will be in Shirdi - Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil,  Maharashtra government's decision

जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.या दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी 6 पदे निर्माण करण्यात येतील.

शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व  राहूरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच उच्चस्तरीय सचिव समितीने सदर कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार व लघुलेखक (निम्नश्रेणी) अशा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येकी एका पदास आणि एकूण तीन पदांना, तर अव्वल कारकूनचे एक पद व लिपीक टंकलेखकची दोन पदे या अतिरिक्त 3 नवीन अशा एकूण ६ पदांनाही आज मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे शिर्डी कार्यक्षेत्रातील सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कामकाजासाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच उपलब्ध होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपुरी हे तालुके चंद्रपूर पासून दूर अंतरावर आहेत. त्याचप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा हरितपट्टा देखील असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा दोन भागात विभागला गेला आहे. यामुळे जनतेची शासकीय कामासाठी पायपीट होते. तसेच विकास कामांनाही विलंब होतो. त्यामुळे चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.अहमदनगर हा जिल्हा राज्यातला क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा असून नागरिकांना महसूलशी संबंधित सर्व कामांकरिता जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे शिर्डी येथे देखील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय घेण्यात आला आहे.