Instagram Thergaon Queen Arrested | इंस्टाग्रामवर अश्लील भाषा, धमकीचे व्हिडिओ बनवणारी ‘थेरगाव क्वीन’ अटकेत

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  इंस्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हिडिओ पोष्ट करणाऱ्या तरुणींना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी (Wakad Police Pune)अद्दल घडवत अटक केली ( Instagram Thergaon Queen Arrested ) आहे.

गेल्या काही दिवसांपासून थेरगाव क्वीन (Thergaon Queen) नावाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर वायरल झाला होता.या व्हिडिओवरून सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या.

‘थेरगाव क्वीन’ नावाने साक्षी श्रीश्रीमल हिचे इंस्टावर अकाउंट असून, त्यावर तिचा मित्र आणि मैत्रिणीसह अश्लील भाषेतील, धमकीचे व्हिडिओ पोष्ट केल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) साक्षी हेमंत श्रीश्रीमल, कुणाल कांबळे आणि साक्षी राकेश कश्यप या तिघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साक्षी श्रीश्रीमल हिचे इंस्टाग्रामवर थेरगाव क्वीन नावाचे अकाउंट आहे. त्यावर, संबंधित आरोपी साक्षी श्रीश्रीमल, साक्षी कश्यप आणि कुणाल कांबळे हे अत्यंत अश्लील भाषेत आणि धमकीचा व्हिडिओ बनवून ते इंस्टाग्रामवर पोष्ट करत असल्याची माहिती आणि त्यांचा व्हिडिओ वाकड पोलिसांना मिळाला होता.

त्यानुसार, पोलिसांनी आरोपी तरुणींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञानासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी केली आहे.

सोशल मिडीया सेलिब्रेटी

सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. सोशल मिडीयावर कुणाचे किती फाॅलोअर्स यावर अनेकांचे लक्ष असते. ज्याचे जास्त फाॅलोअर्स तो किंवा ती स्वता:ला सोशल मिडीया सेलिब्रेटी म्हणून मिरवतात. वास्तविक जीवनात आणि अभासी जगाचा जमीन अस्मानचा फरक असतानाही सोशल मिडीया स्टार होण्यासाठी अनेकांची मोठी धडपड असते.

गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ वाढवणारा

सोशल मिडीयावर चांगले ज्ञानवर्धक कंटेट पोस्ट करून आपले फाॅलोअर्स वाढवणारे खूप कमी जण आपण पाहू शकतो, परंतू काही तरी थिल्लर व्हिडीओ किंवा फोटो किंवा मजकुर टाकून सोशल मिडीया वापरकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न अनेकांकडून होतो. मनोरंजन म्हणून काही व्हिडीओंना जनतेकडून प्रतिसाद मिळतो. परंतू याच गोष्टीचा फायदा उचलून काही जण अश्लील भाषेचा वापर करून आपले फाॅलोअर्स वाढवण्याचा आटापिटा करत असल्याचे दिसून येते. यातला हेतू फाॅलोअर्स वाढवून सोशल मिडीया सेलिब्रेटी होणे हा असला तरी गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ वाढवणारा ठरत आहे.

पालकांनो मुलांना गुन्हेगार होण्यापासून रोखा

सध्या थेरगाव क्वीनचे प्रकरण असेच आहे. या प्रकरणातून तरुणाईचा कल गुन्हेगारीकडे वाढत असल्याचे अधोरेखित करणारं आहे. पालकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपली मुलं मुली सोशल मिडीयाचा वापर करताना नेमकं काय पाहतात याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.याशिवाय आपली मुले मुली कोणत्या मित्रांसोबत राहतात, त्यांचा दिनक्रम काय ? त्यांची नेहमीची भाषा बदलली आहे का ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.