औरंगाबाद : Aurangabad Vaijapur Accident news | औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू तर 22 पेक्षा अधिक जण जखमी झाले. हा अपघात दोन आयशर ट्रकमध्ये झाला.यातील एका गाडीत लग्नाचं वऱ्हाड होतं. ही घटना शिवराई फाट्यावर झाली. (Shivrai fata Accident)
वैजापुर तालुक्यातील शिवराई फाट्यावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. यात जागीच चौघांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबाद व नाशिकमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद लासूर रोडवरील (Aurangabad- Lasur Road Accident) हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनातून वऱ्हाडी औरंगाबाद वरून नाशिककडे (Nashik) लग्न समारंभासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही आयशरमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातात 22 जण जखमी तर 4 जण जागीच मृत्यूमुखी झाल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली आहे. (Vaijapur police)
- Beed Pune Railway News : बीड–पुणे रेल्वे २२ सप्टेंबरपासून नियमित; वेळापत्रक, तिकीट दर, Route अन् Train Number ची संपूर्ण माहिती
- जामखेड : डोळ्यात मिरची पूड टाकून साडेदहा लाख लुटल्याचा बनाव; खर्डा पोलिसांनी तपास केला अन् भलतंच सत्य आलं समोर!
- धक्कादायक: श्रीगोंद्यात कथित गोरक्षकांचा धुडगूस, शेतकरी व चालकाला अमानुष मारहाण; कपडे काढून लघवी पाजल्याचा आरोप,10–15 जणांविरोधात गुन्हा
- एकाच विहिरीत आढळले प्रेमीयुगलाचे मृतदेह, कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना
- ‘मी जात पंचायतचा पंच, ५ लाख रुपये दे नाहीतर खल्लास करू!’; कुटुंबावर जीवघेणा हल्ला, जामखेडमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल
जखमींपैकी 4 जणांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत तर बाकी जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.या अपघातात कविता बाबासाहेब वडमारे (वय 45 वर्ष), प्रज्ञा गौतम गायकवाड (वय 17 वर्ष) मुलगा नामे दिपक वर्हाळे (वय 8 वर्ष),ललिता पवार (वय 48 वर्ष) सर्व राहणार अंबड जि. नाशिक, यांचा जागीच मृत्यू झला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निमीत गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापति, पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट देवून रुग्णवाहीकेतून मयत व जखमींना शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले. (Aurangabad Vaijapur Accident)