शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस, सदस्यत्व धोक्यात?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेतील 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात शिवसेनेने विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना काल याबाबतचे पत्र दिले होते. आज विधानसभा उपाध्यक्षांकडुन त्या सोळा आमदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. येत्या 48 तासात त्या आमदारांना आपले म्हणणे सादर करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. बंडखोरांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न झाले, परंतू शिवसेना विरूद्ध बंडखोर शिवसेना आमदार ही लढाई आता निर्णायक वळणावर आली. बंडखोर आमदार भाजप सोबत जाण्यास आग्रही आहेत, तर शिवसेना अर्थात उध्दव ठाकरे भाजप सोबत जाण्यास तयार नाहीत.

अश्यातच बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेने आधी 12 तर नंतर 4 अश्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती, शिवसेनेचा हा प्रस्ताव झिरवाळ यांनी स्वीकारत आज त्या 16 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

बंडखोर एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं !

16 बंडेखोर आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवल्याने त्यांचं सदस्यत्व धोक्यात आलं आहे. सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याची वेळ या आमदारांना देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 जणांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

आक्रमक शिवसैनिकांंनी आमदार तानाजी सावंतांंचे कार्यालय फोडले

या 16 आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सोमवार पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या आमदारांनी त्यांचं मत न मांडल्यास त्यांना अपात्र ठरववलं जाईल, असं सांगितलं जात आहे. 

साहेब लाल दिवा घेऊन लवकर मतदारसंघात या… कर्जत – जामखेडकरांना लागले राम शिंदेंच्या मंत्रीपदाचे वेध !

आता त्यांची डायलॉगबाजी बंद होईल – अरविंद सावंत

या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले.

मुंबई आणि ठाण्यात कलम 144 लागू

शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडाळीमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे.शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहेत. काही भागात शिवसैनिकांनी आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करणे, त्याचबरोबर आमदारांचे फलक तोडणे अशा घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक शिवसैनिकांकडून निदर्शने केली जात आहेत. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबईत 10 जुलै पर्यंत कलम 144 लागू केले आहे. त्याच बरोबर ठाण्यामध्ये ही कलम 144 लागू करण्‍यात आले आहे.

चोंडीसाठी 7 कोटी तर मतदारसंघातील इतर देवस्थानांसाठी 1 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर !