मोठी बातमी : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची पासपोर्टबाबत मोठी घोषणा, Passport Seva Program 2.0 द्वारे भारतीयांना मिळणार ई-पासपोर्ट !

मुंबई: Passport Seva Program 2.0 : यरदेशी प्रवासासाठी पासपोर्ट (Passport) असणं हे प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाचं असतं, पासपोर्ट असेल तरच विदेशात जाता येऊ शकतं. भारतात 1967 साली पासपोर्ट अधिनियमन लागू करण्यात आला.आता भारतात पासपोर्ट अपडेट (Passport Update) होणार आहे. म्हणजेच आताच्या पासपोर्टची जागा ई-पासपोर्ट घेणार आहे, याबाबतची घोषणा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली. (e-passport Latest News)

ndians will get e-passport through Passport seva program 2.0, External Affairs Minister S Jaishankar's big announcement Regarding the passport, e-passport Latest News,

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसाचं औचित्य साधत पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0 ची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत लोकांना लवकरच चिप असलेला ई पासपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे पासपोर्टसाठी प्रयत्नशील असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कार्यक्रमात सांगितलं की, ‘भारतातील नागरिकांना आता नवे आणि अपग्रेडेड ई पासपोर्ट मिळणार आहेत.’

‘पासपोर्ट सेवा लवकरच नागरिकांना विश्वासार्ह, सुलभ आमि पारदर्शक पासपोर्ट सुविधा देईल. चिप असलेला ॲडव्हान्स आणि अपग्रेडेड पासपोर्ट तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI ची मदत घेतली जाणार आहे.’, असं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितलं.

‘आम्ही पंतप्रधान यांच्या ईज ऑफ लाईफ मंत्राला चालना देण्यासाठी योगदान करत आहोत. यातून आम्हाला आणखी पुढे जायचं असून डिजिटल सिस्टम चांगली करायची आहे. ई पासपोर्ट सुविधा आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून तयार केली जाईल. यात पासपोर्ट इनबिल्ड असणार आहे. या माध्यमातून लोकं आरामात विदेश यात्रा करू शकतील. एआय तंत्रज्ञानामुळे लोकांचा डेटा सुरक्षित राहील.’, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं.

जयशंकर यांचा मेसेज ट्विटरवर शेअर करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे की, ‘परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांचा एक संदेश आहे. आज आम्ही पासपोर्ट दिवस साजरा करत आहोत. परराष्ट्र मंत्रालयाची टीम नागरिकांना विश्वसनीय, सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने वेळेत पासपोर्ट आणि संबंधित सेवा देण्यास कटीबद्ध असल्याचं स्पष्ट करते.’

काय आहे ई पासपोर्ट प्रोग्राम 2.0?

ई पासपोर्ट प्रोग्राम2.0 अंतर्गत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पासपोर्ट तयार केला जाईल. यात लेटेस्ट बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. एआय, अँडव्हान्स डेटा एनालिसिस, चॅट बॉट, लँग्वेज प्रीफरेंजसह क्लाउट कंप्यूटिंगचा वापर करून पासपोर्ट तयार केला जाईल. यामुळे पासपोर्ट तयार करणं सोपं होईल आणि युजर्सचा डेटा सुरक्षित राहील. ई पासपोर्ट सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि एनआयसीने डेव्हलप केलं आहे.

EASE मध्ये काय असणार ?

E : डिजिटल इको सिस्टम वापरून नागरिकांसाठी सुधारित पासपोर्ट सेवा
A: आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे समर्थित सेवा वितरण
S: चिप सक्षम ई-पासपोर्ट वापरून सहज परदेश प्रवास
E:  वर्धित डेटा सुरक्षा

देशात 2014 मध्ये 77 पासपोर्ट केंद्र होती, मागील 9 वर्षांत यात वाढ झाली. जून 2023 अखेर देशात 523 पासपोर्ट सेवा केंद्र कार्यरत आहेत. सन 2022 या वर्षांत 13. 32 मिलियन पासपोर्टचे वितरण करण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली.