Eye Health Tips : लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल तुमच्या डोळ्यांना खूप ताण देतायेत का? तुमचे डोळे खूप दुखतायेत का? मग डोळ्यांच्या आरोग्यासाठी लगेच करा हे घरगुती उपाय !

Eye Health Tips : शरीराचा सर्वात नाजूक भाग म्हणजे डोळे. हल्ली, लोकांना डोळ्यांच्या खूप समस्या होत आहेत.लहान वयातच चष्मा लागल्याची उदाहरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.आजकाल लहान मुले किंवा वृद्ध सर्व जण आपला बराचसा वेळ संगणक, मोबाइल आणि लॅपटॉपवर घालवतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या अतिवापरामुळे डोळे कमकुवत होत आहेत, वेळीच काळजी घेतली नाही तर डोळ्यांच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे हे खूप महत्वाचे आहे. (Eyes Pain Home Remedies)

Eye Health Tips, Are mobiles, laptops, computers straining your eyes? Do your eyes hurt lot ? Then immediately do these home remedies for eyes health, dole dukhane ghaguti upay,

तुम्हीही संगणक, टॅब, मोबाईल आणि लॅपटॉपमुळे डोळ्यांच्या दुखण्याने त्रस्त असाल तर येथे आम्ही तुम्हाला घरबसल्या डोळ्यांच्या दुखण्यावरील काही उपचार सांगत आहोत. (Eye Health Home Remedies)

थंड पाण्याचा शिडकावा (Cold water)

डोळ्यांवरचा थकवा दूर करण्याचा सोप्पा उपाय म्हणजे थंड पाण्याने डोळे धुणे होय. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की अतिशय जास्त थंड पाण्याने डोळे धुवू नयेत. शक्य असल्यास फ्रीजचे अर्धे पाणी आणि साधे पाणी एकत्र घ्यावे आणि त्या पाण्याने डोळे धुवावेत. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होऊन पुन्हा एकदा तुम्हाला फ्रेश वाटेल.

थंड दूध (Cold Milk)

हा उपाय बऱ्याच जणांना माहित नाही पण डोळ्यांवरचा ताण दूर करण्याचा हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेले दुध एका चमच्यात घ्या. आता त्यात कापसाचा बोळा भिजवा. 3 ते 4 मिनिटे हा बोळा डोळ्यांवर ठेवा आणि नंतर बोळा बाजूला करून पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. यामुळे डोळे आणि संपूर्ण शरीरात उत्साह संचारू लागेल.

बर्फाचा शेक (ICE CUBE)

जर थंड पाण्याने डोळे धुवून सुद्धा तुमचा थकवा दूर होत नसले तर तुम्ही हा उपाय वापरून पाहायला हवा. फ्रीज मधून आईसक्यूब बाहेर काढा. हलकेसे धुवून घ्या. आता त्यावर एक कपडा गुंडाळा आणि डोळ्यांना शेक द्या. केवळ 2 ते 3 मिनिटेच शेक द्यावा कारण एवढा वेळ डोळ्यांना ताजेतवाने करण्यास पुरेसा आहे.

डोळ्यांसाठी काकडी (Cucumber)

मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त वेळ घालवल्यामुळे तुमच्या डोळ्यात दुखत असेल तर काकडी तुम्हाला या दुखण्यापासून तात्काळ आराम देऊ शकते.

दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी काकडीचे तुकडे कापून २० मिनिटे डोळ्यांवर ठेवू शकता. याशिवाय काकडी किसून डोळ्यांवर लावू शकता. काकडीचा वापर केल्यास तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.

डोळ्यांसाठी गुलाबपाणी ( rose water)

गुलाबपाणी डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. गुलाबपाणी आपल्याला डोळ्यातील वेदना आणि जळजळ दूर करण्यास मदत करू शकते. गुलाबजलाचे २-२ थेंब डोळ्यात घालून थोडा वेळ आराम करा. गुलाबपाण्याच्या वापराने डोळ्यांतील खाज सुटण्याची समस्याही दूर होते.

डोळ्यांसाठी बटाटे (Potatoes)

काकडीप्रमाणेच बटाटे देखील डोळ्यांच्या दुखण्यापासून मुक्त होऊ शकतात. त्यासाठी बटाट्याचे तुकडे कापून प्रथम २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे. यानंतर डोळ्यांवर थंड तुकडे ठेवा. याच्या वापराने वेदना कमी होतील.

जर तुम्ही जास्त वेळ मोबाईलचा वापर करत असाल तर काही मिनिटांनी अधुन मधून डोळ्यांच्या पापण्यांची उघड-झाप करा. यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत आणि डोळ्यांची जळजळ होणार नाही.

मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी?

मोबाईलचा वापर करत असताना २०-२०-२० या एका मेथडचं पालन करा. म्हणजेच दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी किमान स्क्रिनपासून २० इंच दूर असलेल्या वस्तूकडे पहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

मोबाईलचा वापर करताना स्क्रिनच्या ब्राइटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही बसलेल्या ठिकाणी असलेल्या उजेडा समान किंवा तेवढाच ब्राइटनेस असणं गरजेचं आहे.

अंधारामध्ये किंवा रात्री लाइट बंद केल्यावर मोबाईलचा वापर करणं डोळ्यांसाठी जास्त धोकादायक ठरू शकतं. यासाठी अंधारात मोबाईलचा वापर टाळा. अथवा गरज असल्यास मोबाईल वापरताना ब्राईटनेस अगदी कमी ठेवा.

मोबाईलमध्ये देण्यात आलेला डार्क मोडचा पर्याय डोळ्यांसाठी चांगला असला तरी सतत डार्कमोडवर मोबाईल वापरणं डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकत. यासाठी वेळोवेळी डार्कमोड आणि लाईटमोड बदलत रहा.

अशा प्रकारे डोळ्यांची काळजी घ्यायची असेल तर मोबाईल डोळ्यांपासून दूर पकडणं जास्त गरजेचं आहे. शिवाय मोबाईल्या वापरावर शक्य तेवढं नियंत्रण ठेवणं हे कधीही अधिक योग्य ठरेल.

डोळ्यांपासून मोबाईल किती दुर धरावा ?

अनेक तास मोबाईलमध्ये पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊन डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे थकवा. डोळे कोरडे होणं किंवा डोळ्यांची जळजळ, धुसर दिसणं अशा समस्या निर्माण होतात. अनेक युजर्स स्मार्टफोन वापरत असताना तो चेहऱ्यापासून जवळपास ८ इंच अंतरावर पकडतात. डोळ्यांसाठी हे अत्यंत हानिकारक आहे.

तज्ञांच्या मते स्मार्टफोनमधून निघणारा उजेड हा डोळ्यांसाठी तसचं रेटिनासाठी अत्यंत धोकादायक आहे. यासाठीच जर तुम्ही जास्त वेळ मोबाईलचा वापर करत असाल तर डोळ्यांचं नुकसान कमी व्हावं यासाठी मोबाईल डोळ्यांपासून किमान १६ ते १८ इंच दूर असणं गरजेंचं आहे.