नाशिक महसुल विभागातील 6 उपजिल्हाधिकारी 12 तहसीलदारांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली झाली ? सविस्तर जाणून घ्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याच्या महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने बदल्या केल्या आहेत. नाशिक महसूल विभागातील (Nashik Revenue Divison) उपजिल्हाधिकारी आणि 12 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नव्या बदली आदेशात अहमदनगर जिल्ह्यात दोन नवे तहसीलदार आले आहेत. तर एका उप जिल्हाधिकारी आणि एका तहसीलदाराची जिल्ह्यातून बदली झाली आहे. (Transfers of 6 Deputy Collectors12 Tehsildars in Nashik Revenue Department, which officer was transferred where? Know in detail)

Transfers of 6 Deputy Collectors12 Tehsildars in Nashik Revenue Department, which officer was transferred where? Know in detail

नाशिक महसुल विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. राज्य सरकारने नाशिक महसुल विभागातील काही उप जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहे. महसुल विभागाचे सचिव माधव वीर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

नाशिक विभागात बदली झालेले उपजिल्हाधिकारी खालीलप्रमाणे

संगमनेर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे (Dr shashikant Mangrule) यांची नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

नंदुरबार येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर कार्यरत असलेले नितीन सदगीर (Nitin Sadgir) यांची मालेगावच्या प्रांताधिकारीपदी बदली झाली आहे. महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये सदगीर यांच्या बदलीचा समावेश आहे. येथील प्रांताधिकारी विजयानंद शर्मा (Vijayanand Sharma) यांची बदली प्रस्तावित असताना सदगीर यांची नियुक्ती झाली आहे. शर्मा यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. मालेगाव उपविभागाचे नूतन प्रांताधिकारी म्हणून सदगीर कामकाज पाहतील.

कुंदनकुमार सोनवणे (Kundankumar Sonawane) यांची सहाय्यक आयुक्त नाशिक नियुक्ती झाली आहे. नाशिकलाच ते भुसुधार सहाय्यक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक येथे बदली झाली आहे. तर या पदावर पूर्वी कार्यरत असलेल्या स्वाती थविल (Swati Thavil) यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ नाशिक तर संजय बागडे (Sanjay Bagade) यांची सचिव नंदुरबार या पदावर बदली झाली आहे.यापूर्वी बागडे नंदुरबार येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते.

नाशिक महसुल विभागात बदल्या झालेले तहसीलदार खालील प्रमाणे

1) मंदार कुलकर्णी (नवापूर- चांदवड),
2) श्वेता संचेती (मुक्ताईनगर- त्र्यंबकेश्वर),
3) महेश पवार (नवापूर),
4) संदीप भोसले (कोपरगाव),
5) रोहिदास वारुळे (अहमदनगर- कळवण),
6) गायत्री सौंदाणे (धुळे ग्रामीण- पारनेर जि. अहमदनगर),
7) अरुण शेवाळे (जामनेर- धुळे ग्रामीण),
8) दत्तात्रय शेजूळ (मालेगाव- अपर तहसीलदार, पिंपळनेर),
9) दीपक धिवरे (भुसावळ- मालेगाव),
10) कैलास चावडे (बागलाण),
11) अभिजित बारवकर (इगतपुरी) व
12) सुरेंद्र देशमुख (सिन्नर) यांचा समावेश आहे

अहमदनगर जिल्ह्यात बदलून आलेल्या तहसीलदारांची कोठे झाली नियुक्ती ?

राज्य सरकारने नाशिक महसुल विभागातील ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये पारनेर तहसीलदार म्हणून गायत्री सौंदाणे यांची धुळे ग्रामीण येथून बदली करण्यात आली आहे. तर कोपरगावच्या तहसीलदार म्हणून संदिप भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.