Tehsildar transfer : राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली ? जाणून घ्या सविस्तर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Revenue Department Transfer 2023 । राज्य सरकारने पुणे व नाशिक महसुल विभागातील उपजिल्हा अधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये पुणे विभागातील 10 तहसीलदारांसह 13 उप जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच नाशिक महसुल विभागातील काही उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे. राज्य सरकारच्या महसुल विभागाचे सचिव माधव वीर (Revenue Secretary Madhav Veer) यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (Transfer orders of Deputy Collectors and Tehsildars issued in Maharashtra)

Tehsildars transfer, big news,Transfer orders of Deputy Collectors and Tehsildars issued in Maharashtra, Revenue Secretary Madhav Veer,

सातारा येथील भूसंपादन अधिकारी 2 – संगीता राजापुरकर ( Sangita rajapurkar) यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन अधिकारी क्रमांक 3 येथे बदली करण्यात आली आहे. रोहयोच्या उप जिल्हाधिकारी डाॅ वनश्री लाभशेटवार (Dr. Vanashree Labashetwar) यांची उप जिल्हाधिकारी भूसंपादन 6 येथे बदली करण्यात आली आहे.

फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप (Shivaji Jagtap) यांची सातारा येथे भूसंपादन क्रमांक 2 येथे बदली करण्यात आली आहे. विजय देशमुख (Vijay Deshmukh) हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते, त्यांची बदली कडेगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

वाळवा येथील उपविभागीय अधिकारी संपत खिलारी (Sampat Khilari) यांची कोल्हापूर येथे उपजिल्हाधिकारी (महसुल) म्हणून बदली करण्यात आली आहे.

सोलापूरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे (Bharat Vaghmare) यांची रायगड जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील (Jyoti Patil) यांची उप जिल्हाधिकारी (रोहयो) रायगड येथे बदली करण्यात आली आहे.

उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 सुभाष बागडे (Subash Bagade) यांची पालघर निवासी उप जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

पुणे भूसंपादन क्रमांक 1 चे प्रविण साळुंके (Pravin Salunke) यांची नंदुरबार उप जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

विटाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर (Santosh Bhor) यांची उप जिल्हाधिकारी (सामान्य) उस्मानाबाद (धाराशिव) येथे बदली करण्यात आली आहे.

नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले शैलेश सुर्यवंशी (Shailesh Surywanshi) यांची बीड येथे उप जिल्हाधिकारी (सामान्य ) म्हणून बदली करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले (Sachin Dhole) यांची फलटण उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

उज्ज्वला सरोटे (Ujjwala Sarote) यांची राज्य शेती महामंडळ फलटण येथून दक्षिण सोलापूर तहसीलदार या रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सोनाली मेटकरी  (Sonali Metkari) यांची तहसीलदार वाई येथे पदस्थापना देण्यात आली.

मिनल भामरे (Minal Bhamare) यांना तहसीलदार (रजा राखीव) विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे पदस्थापना देण्यात आली. अनिलकुमार होळकर (Anilkumar Holkar) यांची शिरोळ तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली.

लैला शेख (Laila Shaikh) यांची तहसीलदार पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बदली करण्यात आली. अजित पाटील (Ajit Patil) यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदारपदी बदली करण्यात आली. अमरदीप वाकडे (Amardeep vakade) यांची सातारा पुनर्वसन तहसीलदार तर अर्चना कापसे ( Archana Kapse) यांना तहसीलदार कवठे महाकाळ येथे पदस्थापना देण्यात आली.

संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे (Dr shashikant Mangrule) यांची नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

नंदुरबार येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर कार्यरत असलेले नितीन सदगीर (Nitin Sadgir) यांची मालेगावच्या प्रांताधिकारीपदी बदली झाली आहे. महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये सदगीर यांच्या बदलीचा समावेश आहे. येथील प्रांताधिकारी विजयानंद शर्मा (Vijayanand Sharma) यांची बदली प्रस्तावित असताना सदगीर यांची नियुक्ती झाली आहे.शर्मा यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. मालेगाव उपविभागाचे नूतन प्रांताधिकारी म्हणून सदगीर कामकाज पाहतील. १५ जूनपूर्वी रुजू होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

कुंदनकुमार सोनवणे (Kundankumar Sonawane) यांची सहाय्यक आयुक्त नाशिक नियुक्ती झाली आहे. नाशिकलाच ते भुसुधार सहाय्यक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक येथे बदली झाली आहे. तर या पदावर पूर्वी कार्यरत असलेल्या स्वाती थविल (Swati Thavil) यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ नाशिक तर संजय बागडे (Sanjay Bagade) यांची सचिव नंदुरबार या पदावर बदली झाली आहे.यापूर्वी बागडे नंदुरबार येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते.

याशिवाय राज्यातील नितीन गावंडे, विठ्ठल सोनवणे, अर्चना जाधव-तांबे, संदीप चव्हाण व डॉ. विक्रम बांदल या उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

तहसीलदारांमध्ये मंदार कुलकर्णी (नवापूर- चांदवड), श्वेता संचेती (मुक्ताईनगर- त्र्यंबकेश्वर), महेश पवार (नवापूर), संदीप भोसले (कोपरगाव), रोहिदास वारुळे (अहमदनगर- कळवण), गायत्री सौंदाणे (धुळे ग्रामीण- पारनेर जि. अहमदनगर), अरुण शेवाळे (जामनेर- धुळे ग्रामीण), दत्तात्रय शेजूळ (मालेगाव- अपर तहसीलदार, पिंपळनेर), दीपक धिवरे (भुसावळ- मालेगाव), कैलास चावडे (बागलाण), अभिजित बारवकर (इगतपुरी) व सुरेंद्र देशमुख (सिन्नर) यांचा समावेश आहे