Monsoon Update 2023 : मान्सुन आला रे .. शेतकऱ्यांसाठी खुशखबर… महाराष्ट्रातील ‘या’ भागात मान्सूनचे आगमन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात मान्सून (monsoon update 2023) कधी दाखल होणार याची चातकासारखी वाट पाहणार्‍यां शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने रविवारी आनंदाची बातमी दिली. महाराष्ट्रात आज 11 जून 2023 रोजी मान्सून (monsoon in maharashtra) दाखल झाला आहे, येत्या 48 तासांत मान्सूनची प्रगती महाराष्ट्रातील इतर भागात होईल असा अंदाज IMD कडून व्यक्त करण्यात आला आहे.

Monsoon update 2023, Monsoon has arrived in maharashtra today, good news for farmers, arrival of monsoon in South Madhya Maharashtra including South Konkan in Maharashtra, monsoon latest news,

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा, रत्नागिरी, आणि कोल्हापुरचा काही भाग आज व्यापला आहे. (Monsoon has arrived in Maharashtra) मान्सूनची प्रगतीची उत्तरसीमा रत्नागिरी,शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरीकोटा, धुबरी येथून जात आहे. मान्सून दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागात दाखल होईल असे IMD ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मॉन्सूनने शनिवारी केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा बहुतांश भाग व्यापला होता.रविवारी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर मान्सूनने धडक दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगांची रेलचेल सुरु झाली आहे.

वातावरणात उष्णता अन अकाशात ढगांची दाटी दिसू लागली आहे.यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.