कर्जत बाजार समिती सभापती निवडणूक निकाल 2023 : कर्जत बाजार समितीवर भाजपचा कब्जा, कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्या आमदार प्रा राम शिंदे यांच्या ताब्यात

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । संपुर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कर्जत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक (Karjat Bazar Samiti Sabhapati Niwadnuk Nikal) रविवारी (11 जून रोजी) पार पडली. या निवडणुकीत भाजपने (BJP) पुन्हा एकदा राष्ट्रवादीला (NCP) आस्मान दाखवत या निवडणुकीत बाजी मारली आहे. आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी पुन्हा एकदा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक मत बाद झाले तर एक मत भाजपला मिळाले.आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मतदारसंघात राजकीय हवा निर्माण झाली आहे. असाच संदेश या निकालाने दिला आहे. (Karjat Market Committee Chairman Election Result 2023)

Karjat Bazar Committee Chairman Election Result 2023, Karjat Bazar Committee captured by BJP, Kakasaheb Tapkir elected as Chairman,  both the market committees in Karjat-Jamkhed constituency are under the control of MLA Prof. Ram Shinde

जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीवर भाजपने झेंडा फडकावल्यानंतर कर्जत बाजार समितीवर (Karjat Bazar Samiti Sabhapati Niwadnuk Nikal) कोणाचा झेंडा फडकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. कर्जत बाजार समितीवर कब्जा मिळवण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde BJP) व आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar NCP) यांच्यात चुरस निर्माण होती.अखेर कर्जत बाजार समितीवर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने (Karjat Taluka Swabhimani Shetkari Vikas panel) कब्जा मिळवला आहे.

कर्जत उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांच्या कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल विरूध्द राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडीत सामना रंगला होता.या निवडणुकीत कर्जतकरांनी दोन्ही नेत्यांच्या पॅनलला 9-9 जागा दिल्या होत्या.भाजपकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली होती, त्यात कुठलाही उलटफेर झाला नाही. दोन्ही गटाकडे 9-9 जागा निश्चित होताच निवडून आलेले संचालक सहलीवर रवाना झाले होते.कोणताही दगाफटका होऊ नये याकरिता आमदार प्रा.राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी ही खबरदारी घेतली होती.

रविवारी 11 जून 2023 रोजी कर्जत कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती निवडणुक कार्यक्रम पार पडला.दुपारी एकच्या सुमारास सहलीवर गेलेले सर्व संचालक वेगवेगळ्या मार्गाने कर्जतमध्ये दाखल झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनकडून सभापतीपदासाठी काकासाहेब तापकीर (Kakasaheb Tapkir) व उपसभापतीपदासाठी अभय (आबा) पाटील (Abhay Patil) यांच्या उमेदवारीची घोषणा आमदार प्रा राम शिंदे यांनी केली होती.

Karjat Bazar Committee Chairman Election Result 2023, Karjat Bazar Committee captured by BJP, Kakasaheb Tapkir elected as Chairman,  both the market committees in Karjat-Jamkhed constituency are under the control of MLA Prof. Ram Shinde
विजयी जल्लोष साजरा करताना भाजपा कार्यकर्ते व नेते

तर राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी गुलाबराव तनपुरे (Gulab tanpure) व उपसभापतीपदासाठी श्रीहर्ष (Shriharsh Shewale) शेवाळे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली होती.त्यानुसार या सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.अर्ज छाननीत सर्व अर्ज वैध ठरले.त्यानंतर मतदान घेण्यात आले.यात भाजपने दोन्ही जागांवर विजय मिळवला.

कर्जत बाजार समितीच्या सभापतीपदी काकासाहेब तापकीर

कर्जत बाजार समितीवर भाजपचा कब्जा, कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार काकासाहेब तापकीर व उपसभापतीपदाचे उमेदवार अभय (आबा) पाटील हे विजयी झाले. यावेळी पार पडलेल्या मतदानात सभापतीपदाच्या दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मत बाद झाले त्यामुळे सभापतीपदी काकासाहेब तापकीर यांना विजयी घोषित करण्यात आले तसेच उपसभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार अभय (आबा )पाटील यांना १० मते मिळाल्याने ते विजयी झाले. अभय पाटील यांनी राष्ट्रवादीचे एक मत फोडण्यात यश मिळवले.

कर्जत बाजार समिती पदाधिकारी निवडणुकीत कोणाचे मत बाद झाले ? राष्ट्रवादीचे कोणते मत फुटले याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. कर्जत बाजार समितीच्या पदाधिकारी निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या अंगावर विजयी गुलाल पडला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्यांवर आमदार प्रा.राम शिंदे गटाने कब्जा मिळवला आहे.आमदार रोहित पवार गटावर पराभवाचा सामना करण्याची नामुष्की ओढवली. कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूक भाजपच्या बाजूने कौल लागताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण अन फटाक्याची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

कर्जत-जामखेडची राजकीय गणिते बदलू लागले

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठे राजकीय उलटफेर झाले होते. भाजपचा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी घुसली होती पण अडीच वर्षानंतर राजकीय गणिते बदलली. भाजपने प्रा राम शिंदे यांना विधानपरिषदेवर आमदार केले. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या भाजपात नवचैतन्य आले. आमदार प्रा.राम शिंदे यांनी आखलेले डावपेच गेल्या काही महिन्यांपासून यशस्वी ठरत आहेत. आता तर दोन्ही बाजार समित्यांवर भाजपने कब्जा मिळवत आपला बालेकिल्ला मजबूत करण्याच्या दृष्टीने दमदार वाटचाल सुरु केली आहे. बाजार समिती निवडणुकीत आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्यामुळे गावागावात शिंदे यांची लोकप्रियता वाढू लागली आहे.अडीच वर्षापुर्वी एकतर्फी वाटणार्‍या मतदारसंघात आता भाजप जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.