खळबळजनक : संपत्तीसाठी आईसह तिच्या दोन मुलींना जाळण्याचा प्रयत्न, दिराचे धक्कादायक कृत्य !

औरंगाबाद : संपत्तीच्या लालसेपोटी (property dispute) सख्या दिराने वहिनीसह तिच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याचा (Attempt to burn ) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जाफराबादमध्ये (Jafarabad ) घडली आहे. यामध्ये मायलेकी भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. (Attempt to burn mother along with her two daughters for wealth, shocking incident in Konad village of Jaffrabad taluka, jalana crime news)

त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी औरंगाबादला नेण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड (konad) या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मंगलाबाई परिहार यांच्या पतीचे गेल्या पाच महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्या आपल्या दोन मुलीसह गावाजवळ असलेल्या त्यांच्या शेतामध्ये राहतात.मंगलाबाई परिहार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीवर त्यांचा दिर समाधान परिहार हा डोळा ठेवून असल्याने, तो वारंवार वाद घालत होता त्यातूनच त्याने त्यांची आणि मुलींची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

2 जुलै रोजी रात्री आरोपी समाधान रामसिंग परिहार याने कट रचून, तिघी मायलेकी घरामध्ये झोपलेल्या असताना रात्री तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली, याची भनक लागताच तिघी मायलेकींनी आटापिटा करत कसा बसा घरातून पळ काढला, मात्र बाहेर येताच समाधान रामसिंग परीहार याने दोघी मायलेकीच्या अंगावर, पाठीवरील पंपाने पेट्रोल शिंपडून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये मंगलाबाई परिहार तसेच पूनम परिहार या दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून, ज्ञानेश्वरी परिहार या छोट्या मुलीने तिथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. जखमी मायलेकींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याच्यावर सध्या औरंगाबादला उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपी समाधान परिहार वर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मंगलाबाई परिहार यांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी सुद्धा आरोपी समाधान परिहार विरोधात जाफराबाद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त tv9 मराठीने दिले आहे.