जामखेड : डाक विभागात महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु | mahila samman savings certificate scheme 2023

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । mahila samman savings certificate scheme 2023। देशातील महिलांची आर्थिक उन्नती सुनिश्चित करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेचा जामखेड तालुक्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेचे पहिले महिला सन्मान बचत पत्र (mahila samman savings certificate scheme 2023) घेण्याचा बहुमान रितिका जगदीश पेनलेवाड या एका वर्षाच्या मुलीला मिळाला. डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

mahila samman savings certificate scheme 2023 launched by post office

देशातील महिलांची आर्थिक उन्नती सुनिश्चित करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजना महिला व मुलींकरिता उपलब्ध आहे.या योजनेत ७.५ टक्के व्याजदराने गुंतवणूक करण्याची संधी डाक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत मिळणाऱ्या बचत पत्राची मुदत दोन वर्ष असणार आहे.

mahila samman savings certificate scheme 2023 launched by post office

एका महिलेच्या नावावर किमान एक हजार व कमाल दोन लाखापर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.दोन गुंतवणूकीमध्ये किमान तीन महिन्यांचे अंतर असले पाहिजे.गरज भासल्यास एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील ४०% रक्कम एकदा काढता येईल.अधिक माहीतीसाठी नजिकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय डाक निरिक्षक अमित देशमुख यांनी केले आहे.

यावेळी अविनाश ओतारी, जगदीश पेनलेवाड लक्ष्मण काटे, बापूराव पंडित,राजकुमार कुलकर्णी, कालिदास कोल्हे, गोरख राजगुरू, दादासाहेब धस, सह आदी उपस्थित होते.