व्हॉइस ऑफ मीडिया बनलीय देशातील नंबर वन पत्रकार संघटना, देशात ‘व्हॉइस ऑफ मीडियाचे 26 हजार सभासद

दिल्ली : अवघ्या दोन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेत 26 हजार 312 सभासदांचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रात हा आकडा साडेचार हजारांहून अधिक झाला आहे. पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला देशातील पत्रकारांनी आपल्या हक्काची चळवळ बनवली आहे. संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये संपुर्ण देशभरात ऑनलाईन पद्धतीने सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार असल्याची माहिती ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.

Voice of Media has become the number one journalist organization in the country, Voice of Media has 26 thousand members in India

अवघ्या दोन वर्षांत संपूर्ण राज्यात आणि देशभरात आपल्या विचार आणि कृतिशील कार्यक्रमांच्या माध्यमांतून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. पत्रकारिता आणि पत्रकारांचे कल्याण अशी महत्त्वपूर्ण भूमिका घेत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ची वाटचाल मोठ्या गतीने सुरू झाली. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांचे घर, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांची स्किलिंग, पत्रकारांच्या सेवानिवृत्ती नंतरची मदत, या प्रश्नांवर थेट कृतिशील कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये बुलढाणा या ठिकाणी अनेक पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आले. ते यशस्वी झाले आणि तेच प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत राबवले गेले. महाराष्ट्रामध्ये राबवलेले प्रयोग देशातल्या अनेक राज्यांत राबवण्यात आले. पत्रकारांसाठी हक्काची विचारधारा आणि कृतिशील कार्यक्रम, यामुळे देशातील सर्वच राज्य  ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ च्या माध्यमातून व्यापले गेले. कृतिशील कार्यक्रम आणि हजारो पत्रकारांचे पाठबळ यातून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ देशातील नंबर वन पत्रकारांची संघटना झाली आहे, असे यावेळी संदिप काळे यांनी स्पष्ट केले.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, मंदार फणसे, फिरोज पिंजारी, राष्ट्रीय कार्यवाहक शंतनू डोईफोडे, उर्दू विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हारून नदवी सचिव दिव्या पाटील यांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या सध्या सुरू असलेल्या प्रवासाबद्दल यावेळी विस्ताराने माहिती दिली.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची कार्यप्रणाली देशातल्या तळागाळात असणाऱ्या त्या प्रत्येक पत्रकाराने स्वीकारली. नियमित होणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे कार्य प्रत्येक पत्रकारापर्यंत पोहचले. आता अजून या कामाला गती येणार आहे, असे यावेळी संदिप काळे म्हणाले.

येत्या ३० एप्रिलला महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्याच राज्यांची संघटनात्मक बांधणी,उपक्रम आढावा हे  दोन्ही कार्यक्रम संपुष्टात येणार आहेत. त्यानंतर अजून थेट कृतिशील कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पत्रकार समन्वय समिती, त्या त्या राज्याचे सरकार, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’शी संबंधित असणारा प्रत्येक सदस्य या कृतिशील कार्यक्रमांमध्ये उतरणार आहे. लवकरच दिल्लीमध्ये देशभरामधल्या सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याची माहितीही संदीप काळे यांनी दिली.

देशात ऑनलाईन पद्धतीने सदस्य नोंदणी केली गेली. सध्या सुरू असलेला एप्रिल महिना पूर्णतः सदस्य नोंदणीचा महिना असणार आहे. नव्याने येणाऱ्या, जुन्या राहिलेल्या पत्रकार असणाऱ्या सदस्यांनी ऑनलाईन पद्धतीने सदस्य नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या केंद्र आणि सर्व राज्याच्या वतीने करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी नंतर सदस्य नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार आहे.