लोकसभा की विधानसभा ? अखेर मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, जरांगे पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनो आजपासून जोमाने कामाला लागा !

Manoj Jarange Patil politics entry : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करणार आहेत. लोकसभेऐवजी विधानसभेच्या मैदानात जरांगे पाटील उतरताना दिसणार आहे. कार्यकर्त्यांनो आजपासूनच विधानसभा निवडणूकीच्या तयारी लागा असे अवाहन त्यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाज अपक्ष उमेदवार उभे करणार नाही, ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Lok Sabha or Vidhan Sabha? Manoj Jarange Patil finally took big decision, Jarange Patil said, workers start working vigorously for  Vidhan Sabha from today, latest news

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत धाकधूक वाढलेली असतानाच जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान करून सर्वांनाच धक्का दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी थेट राजकारणात येण्याचंच सूतोवाच केलं आहे. विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर करतानाच उद्यापासूनच विधानसभेच्या कामाला लागा, असे आदेशच मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यामुळे अनेकांची राजकीय खेळी उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी घोषण केली आहे. मराठा समाज आता हुशार झाला आहे आणि लोक म्हणाले म्हणून आता काम करायचे नाही. आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकत नाही आणि आणि आमच्याकडे 40 उमेदवार उभे करण्याचा डेटा नाही. काहीही करायला लागलो तर जात संपेल, समाजाची हानी होईल, असं सांगतानाच राहिलेले आरक्षण द्यायला मी खंबीर आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

करेक्ट कार्यक्रम करायचा

मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जायचे नाही. बारकाईने लक्ष ठेवायचे आहे. आता करेकट कार्यक्रम करायचा आहे. आम्हाला जे लागते ते द्या. मग तुम्ही उताणे पडा किंवा सरळ पडा, त्याच्याशी आम्हाला काहीही घेणंदेणं नाही. आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मी कुणाला मतदान करा म्हणणार नाही. पण जे आरक्षणाच्या बाजूने आहे त्यांनाच मतदान करायचे आहे. कुणाला पाडायचं हे आता मराठ्यांनी ठरवायचं आहे, असंही ते म्हणाले.

112 जागा लढवणार

उद्यापासून विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे. आम्ही 112 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा लढवणार आहोत, अशी घोषणा करतानाच तुम्ही काहीच करत नाहीत आणि तुम्हीच आम्हाला राजकारणात ढकलत आहात. ही वेळ तुम्हीच आमच्यावर आणली आहे, असंही जरांगे यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री मनातून उतरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमची खूप माया होती. ते कोणत्या पक्षातून कुठे गेले याच्याशी मराठ्यांना काहीच घेणंदेणं नव्हते आणि नाही. शिंदे साहेबच आम्हाला आरक्षण देतील असं आम्ही म्हणायचो. पण ते मराठ्यांच्या मनातून उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मी सहा महिने काहीच बोललो नाही. ते गुन्हे दाखल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.