दिवसभरातील २५ मोठ्या बातम्या | 3 जानेवारी 2022 | 25 big news stories of the day | वाचा प्रत्येक बातमी एका वाक्यात !

जामखेड टाईम्स | दिवसभरातील 25 मोठ्या बातम्या । 3 जानेवारी 2021 I वाचा प्रत्येक बातमी एका वाक्यात | 25 big news stories of the day

1) देशभरात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी,  दिवसभर सुरु होती वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल

2)  राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक, पोलिसांना शिवीगाळ करणं भोवले, राजू कारेमोरे असे अटक केलेल्या आमदाराचे नाव.

3) मुंबई बँकेवर प्रविण दरेकरांचे वर्चस्व, सहकार पॅनलने जिंकल्या 21 जागा

4) अहमदनगर  : भाजपा खासदार सुजय विखे पाटीलांना कोरोनाची बाधा

5) अहमदनगरमध्ये चोरट्यांनी फोडले दोन ATM

6) समीर वानखेडेंच्या बेकायदेशीर कारनाम्यांचा पर्दाफाश करतच राहणार – नवाब मलिकांनी पुन्हा ठणकावले.

7) पुण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्याला तरूणीकडून मारहाण

8) हिवरे बाजार वाचवणार 8 कोटी 36 लाख लीटर पाणी, ग्रामपंचायतीने मांडला ताळेबंद

9) मुंबईतील शाळांना पुन्हा कुलूप, 31 जानेवारी पर्यंत शाळा राहणार बंद, पहिली ते आठवीच्या शाळा बंदचा निर्णय, महापालिका आयुक्त

10)  मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळा बंदचा निर्णय, पहिली ते नववी आणि आकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

11) कर्जत नगरपंचायतच्या 4 प्रभागासाठी 28 उमेदवारी अर्ज दाखल, पुन्हा रोहित पवार विरूध्द राम शिंदे संघर्ष उफाळणार

12) MPSC च्या परिक्षांच्या नव्या तारखांची घोषणा !

13) पुण्यातील कोरोना निर्बंधाबाबत उद्या होणार निर्णय – महापौर मुरलीधर मोहळ यांची माहिती

14)  जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा पत्नीसह रूग्णालयात दाखल, बॉलीवूडमध्ये कोरोनाचा कहर, जाॅन अब्राहम, एकता कपुर नंतर प्रेम चोप्रांनाही कोरोनाची लागण

15) मुंबई वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू राहणार, स्थानिक पातळीवर होणार निर्णय  – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

16)  7 ते 16 जानेवारी दरम्यान होणारी UPSC ची परिक्षा पुढे ढकला अशी मागणी परीक्षार्थीना केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मागणी करण्यात आली आहे.

17) जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, श्रीनगर मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

18) NCB चे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंची बदली

19) सोलापुर जिल्ह्यात 91 लाख टन ऊसाचे गाळप

20) अहमदनगर जिल्ह्यातील प्रेमी युगलाची कोल्हापूरात आत्महत्या, अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्रीनिवास गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

21) सांगली जिल्ह्यातील गव्याची पुन्हा एन्ट्री, ठाणापुडे, चिकुर्डे परिसरात गव्हाच्या कळपाचे दर्शन

22) राज्यात आज 1 हजार 748 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले तर 11 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला   !

23) कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्रातील 13 बसेस माघारी फिरल्या, RTPCR रिपोर्ट तसेच कोरोना डोस नसल्याच्या कारणावरून या बसेस माघारी पाठवण्यात आल्या.

24) महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच, राज्यात दिवसभरात 12 हजार 160 रूग्णांची नोंद, राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या झाली 52 हजार 422

25) राज्यात ओमिक्रॉनचा उद्रेक सुरूच, दिवसभरात आढळले  68 रूग्ण, राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या झाली 578