अहमदनगर जिल्ह्यातील प्रेमीयुगुलाची कोल्हापूरात आत्महत्या, जिल्ह्यात उडाली खळबळ

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रेमीयुगुल जोडीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्रीनिवासमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्रीनिवासमध्ये (धर्मशाळा) राहूल विश्वासराव मच्छे (वय २५), प्रियंका विकास भराडे (२२) या प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोघेही अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील रहिवासी आहेत

दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईडनोट आढळून आली. आत्महत्या करण्यापूर्वी मयत प्रियंका हिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. त्यामध्ये, आम्ही प्रेम करतो, पण प्रेम कोणाला कळले नाही.आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरु मात्र शकतो असे लिहीले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत राहूल मच्छे व प्रियंका भराडे हे एकाच गावचे रहीवासी आहेत. प्रियंकाचे तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झालेला आहे. गेले काही वर्षे दोघांमध्ये प्रेमसंबध होते. ते दोघे ३१ डिसेंबर २०२१ रोजी एस.टी. बसने कोल्हापूरात आले. ते ताराबाई रोडवरील एका यात्रीनिवासमध्ये उतरले. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी रुमचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने यात्रीनिवास मालकांना शंका आली. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव व उपनिरीक्षक प्रितम पुजारी यांनी संबधीत यात्री निवासला भेट दिली. त्यांनी रुमचा दरवाजा तोडून काढला असता दोघा प्रेमीयुगलांनी फॅनच्या हुकाला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.