जामखेड : क्रांती दिनानिम्मित हळगाव कृषि महाविद्यालयात पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : जामखेड तालुक्यातील हळगाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमांतर्गत पंचप्रण शपथ घेण्यात आली.

Jamkhed, Panchapran Oath at Halgaon College on the occasion of Revolution Day

दरवर्षी ९ ऑगस्ट या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली म्हणून क्रांती दिन साजरा केला जातो. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगाव येथे बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३ क्रांती दिन साजरा करण्यात आला.

यावेळी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट पवार, डॉ, मनोज गुड, डॉ. प्रेरणा भोसले, इतर प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी यांनी विकसित भारत देश निर्माण करून, देशाचा सांस्कृतिक वारसा वाढविण्यासाठी, देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी आणि शूरवीरांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली. राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.