मोठी बातमी : सारथीच्या कौशल्य विकास कार्यक्रमात ५०० उमेदवारांना मिळणार रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण, अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांनो पटकन करा नावनोंदणी !

अहमदनगर दि. 9 ऑगस्ट : सारथीमार्फत जिल्ह्यातील 500 उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या घटकातील अधिकाधिक उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या लिंकद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन श्री. नि. ना. सूर्यवंशी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, अहमदनगर यांनी केले आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षित गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त व्हावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

सारथी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन २०२२-२३ या वर्षामध्ये सारथीच्या लक्षित गटातील (मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा) अहमदनगर जिल्ह्यामध्ये ५०० उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सारथीच्या लक्षित गटातील ५०० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता सारथी कार्यालयामार्फत उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार असुन सोसायटीच्या संकेतस्थळावर उमेदवारांनी  नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे.