मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने ठोकला पक्षाला रामराम, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

धुळे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रवादीत काका विरूध्द पुतण्या संघर्ष तापला आहे. राष्ट्रवादीत सुरू असलेल्या धुसफुसीमुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता आहे.अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकण्याच्या मनस्थितीत आले आहेत.याची पहिली ठिणगी खानदेशात (Khandesh) पडली आहे.धुळ्यातील (Dhule) राष्ट्रवादीचे वजनदार नेते माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी पक्षाला राम राम ठोकण्याची घोषणा (Big announcement) केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याने सामान्य माणसांचे प्रश्न सुटण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, परंतू पक्षात माझी निराशा झाली झाली, त्यामुळे पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली. आपल्या राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil NCP) यांना पाठविण्यात आला असल्याचेही गोटे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीत प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करत होतो. संघटना वाढीसाठी खूप काम केले. पण आता मी प्रदेश उपाध्यक्ष पदासह पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्ष सोडला असला तर आपण शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडलेली. शरद पवार यांचे विचार आजही कायम आहेत. असे सांगत गोटे पुढे म्हणाले की, मी कुठल्याही पक्षात जाणार नसून यापुढची राजकीय वाटचाल माझ्या लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमांतून करणार आहे. लोकसंग्राम पक्षाच्या (LokSangram Party) माध्यमांतून सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे तसेच विकासाचे काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माजी आमदार अनिल गोटे हे अतिशय धडाकेबाज राजकीय नेतृत्व म्हणून राज्यात ओळखले जातात. धुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना मानणारा मोठा गट आहे.राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापुर्वी ते भाजपात होते.भाजपातील गटबाजीच्या राजकारणाला वैतागून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतू राष्ट्रवादीतही त्यांच्या वाट्याला गटबाजी आली.यालाच कंटाळून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असणार आहे. अगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे. हेच आता स्पष्ट आहे.