Swarajya Dhwaj | खर्ड्यात होणाऱ्या स्वराज्य ध्वज कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निमंत्रण !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ता १५ :  जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ला परिसरात भारतातील सर्वात उंच ‘भगवा स्वराज्य ध्वज’ लवकरच बसवला जाणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना आज (ता १५ रोजी) आमदार रोहित पवार यांनी दिले. (Invitation to Union Minister Jyotiraditya Shinde for the Swarajya Dhwaj program to be held in Kharda)

आमदार रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्ली दौर्‍यावर आहेत. त्यांचा हा दौरा भलताच चर्चेत आहे.कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विविध खात्यांच्या मंत्र्यांशी त्यांनी संवाद साधत विविध मागण्यांचे निवेदने दिली आहेत. आमदार रोहित पवार यांनी दिल्ली दौर्‍यात अत्तापर्यंत साधारणता: दहाच्या आसपास केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

Invitation to Union Minister Jyotiraditya Shinde for the Swarajya Dhwaj program to be held in Kharda
Invitation to Union Minister Jyotiraditya Shinde for the Swarajya Dhwaj program to be held in Kharda

आमदार पवार यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांची भेट घेत त्यांना स्वराज्य ध्वजाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तसेच विविध विषयांवर संवाद साधला. याबाबत रोहित पवारांनी ट्विट करत माहिती दिली आहे.(Invitation to Union Minister Jyotiraditya Shinde for the Swarajya Dhwaj program to be held in Kharda)

रोहीत पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, खर्ड्याच्या ऐतिहासिक लढाईत अनेक शूरवीर सरदारांनी, योध्यांनी अतुल्य पराक्रम गाजवला. यामध्ये श्रीमंत तुकोजीराजे शिंदे यांचे नातू राजे दौलतराव शिंदे यांचाही समावेश होता. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी निजामाच्या फौजांना सळो की पळून करुन सोडलं. इतिहासाच्या याच धाग्यातून केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दिल्लीत भेट घेऊन खर्डा किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या ‘स्वराज्य ध्वजा’च्या कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण दिलं. यावेळी इतरही विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली.(Invitation to Union Minister Jyotiraditya Shinde for the Swarajya Dhwaj program to be held in Kharda)

Invitation to Union Minister Jyotiraditya Shinde for the Swarajya Dhwaj program to be held in Kharda
Invitation to Union Minister Jyotiraditya Shinde for the Swarajya Dhwaj program to be held in Kharda