Rohit Pawar Delhi visit | रोहित पवारांनी ‘या’ कारणासाठी घेतली केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांची भेट

१० लाख घरकुलांचे प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडं प्रलंबित

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ता १५ :  आमदार रोहित पवार यांचा दिल्ली दौरा भलताच चर्चेत आला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटीचा घेण्याचा सिलसिला पवारांकडून सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supariys sule) यांच्या माध्यमांतून रोहित पवारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.(Rohit Pawar Delhi visit)

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील (Karjat Jamkhed Constituency) प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा दौरा असला तरी या दौर्‍याच्या माध्यमांतून दिल्लीच्या नेत्यांच्या ओळखी वाढवण्याचा, दिल्लीचे राजकारण समजुन घेण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh
rohit pawar meets union minister giriraj singh in Delhi visit

आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्यासह तीन मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने देत सविस्तर संवाद साधला होता. भेटीचे फोटो सोशल मिडीयावर झळकताच त्या भेटीची राज्यात खूप चर्चा झाली होती. बुधवारी केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीराज सिंह (Union Minister for Rural Development and Panchayat Raj Giriraj Singh) यांच्या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर झळकले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता. १४) रोजी केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली.मतदारसंघातील ६ ते ७ हजार तर राज्यातील सुमारे १० लाख घरकुलांचे प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडं प्रलंबित आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती रोहित पवार यांनी केली.(Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh)

Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh
rohit pawar meets union minister giriraj singh in Delhi visit

मनरेगामध्ये राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) / राज्य योजनेच्या ५२.६% घरांची कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना /राज्य योजनेतील घरकामासाठी घरांच्या हप्त्यानुसार टप्प्याटप्प्याने मस्टर जारी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मस्टरची काही रक्कम थकीत आहे. अशा प्रलंबित घरांच्या मस्टरसाठी मुदतवाढ द्यावी. प्रधानमंत्री आवास योजना, आवास प्लस अंतर्गत लाभार्थी अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. (Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh)

त्यात आवास यादीतून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत, हे निकष शिथिल करावे, श्रेण्यांसाठी लक्ष्य वाढविणे, घराची किंमत २ लाख रुपये पर्यंत वाढवणे, काही पात्र कुटुंबांना चुकीच्या माहिती अपलोड केल्यामुळे सिस्टममधून वगळण्यात आले आहे.

Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh

यासाठी माहिती संपादनाची अद्ययावत सुविधा प्रदान करावी आणि विविध तांत्रिक समस्यांमुळे अनेकजण नोंदणी करू शकले नाहीत. अशा पात्र लाभार्थ्यांसाठी नोंदणी विंडो आणखी १५ दिवसांसाठी पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात यावी आणि महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांचा विचार करावा ही विनंती आमदार रोहित पवार यांनी गिरीराज सिंग यांना केली. (Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh)

सोबतच श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन मिशन (Shyama Prasad Mukherjee National Rurban Mission) अंतर्गत कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील काही क्लस्टर विकसित केले जावेत.मूलभूत लोकसंख्या निकषात पात्र असलेली जामखेड तालुक्यातील खर्डा आणि नान्नज -जवळा आणि कर्जतमधील राशीन आणि कुळधरण येथे एसपीएमआरएमच्या (SPMRM) नेतृत्वाखाली विकसित करण्याची मागणी निवेदनाद्वारे गिरीराज सिंग यांना केली. (Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh)

Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh

कर्जत- जामखेडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत आणि एसपीएमआरएमच्या अंतर्गत क्लस्टरला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी गिरीराज सिंग यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये असता केंद्रीय मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला (Union Minister for Fisheries, Animal Husbandry and Dairying Purushottam Rupala) यांची भेट घेऊन मतदारसंघातील विषयांवर चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Union Minister of State for Finance Bhagwat Karad) यांना भेटून मतदारसंघातील बँकांच्या अडचणी आणि शाखांची संख्या वाढविण्याबाबत चर्चा केली.

 

 

 

Web title: Rohit Pawar Delhi visit meets union minister giriraj singh