10th 12th Exam 2021 | दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर,विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळातर्फे करण्यात आली समुपदेशनाची व्यवस्था

पुणे, ता १५ : 10th 12th Exam 2021 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, पुणे विभागीय मंडळ पुणे यांच्या वतीने येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) १६ सप्टेंबर २०२१ पासून व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) २२ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. विद्यार्थी व पालकांना हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन (Dates of 10th and 12th examinations announced)

परीक्षा कालावधीत (10th 12th Exam 2021) विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्हयातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. (Pune Divisional Board Counseling has been arranged for students and parents to take the exam in a stress free environment)

विद्यार्थ्यांना/पालकांना काही समस्या असल्यास दुरध्वनी/भ्रमणध्वनी वर सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत संपर्क साधावे,हेल्पलाईनवर परीक्षेच्या काळात (10th 12th Exam 2021) समुपदेशनासाठी  सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत संपर्क साधावे. इयत्ता १२ वीसाठी ७५८८०४८६५०, इयत्ता १० वी 9423042627 भ्रमणध्वनी क्रमांक असे आहेत. समुपदेशनाची सेवा, समुपदेशकाच भ्रमणध्वनी क्रमांक परीक्षा कालावधीपुरते मर्यादित राहतील. Pune Divisional Board

पुणे जिल्ह्यासाठी संदीप शिंदे, बालकल्याण शिक्षण संस्था बारामती, भ्रमणध्वनी क्रमांक 9822686815, अहमदनगर जिल्ह्यासाठी एस.एल. कानडे, ज्ञान सरिता विद्यालय, वडगाव गुप्ता ता.जि.अहमदनगर, भ्रमणध्वनी क्रमांक 9028027353, सोलापूर जिल्ह्यासाठी पी.एस. तोरणे, सदाशिव माने विद्यालय, अकलुज, तालुका माळशिरस जि.सोलापूर, भ्रमणध्वनी क्रमांक 9960002957 या समुदेशकाची जिल्हानिहाय नेमणूक करण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाच्या (Pune Divisional Board) विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. (10th 12th Exam 2021) 

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune, Pune Divisional Board, Pune is starting the Higher Secondary Certificate Examination (Class 12) from 16th September 2021 and Secondary School Certificate Examination (Class 10) from 22nd September 2021