Crime News Today | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Crime News Today | केज तालुक्यातील एका खुनाच्या एका गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस जामखेडमध्ये बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी बजावली आहे.

केज तालुक्यातील हांगेवाडी, पोस्ट रामेश्वर या गावात 22 जानेवारी 2022 रोजी एक खुनाची घटना घडली होती. या घटनेत सखुबाई बन्सी शिंदे रा. हांगेवाडी, पोस्ट रामेश्वर ता.केज, जि.बीड या महिलेचा मृत्यू झाला होता. सदर घटनेतील आरोपी राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे रा.हांगेवाडी, पोस्ट रामेश्वर ता.केज, जि.बीड हा गुन्हा घडलेपासून फरार झाला होता.

या प्रकरणातील आरोपीने दारु पिण्यासाठी व गांज्यासाठी पैसे दे असे म्हणत महिलेचा खून केला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. फरार आरोपी जामखेड पोलिस स्टेशन हद्दीत वावरत असल्याची माहिती जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाला मिळाली होती.

जामखेड पोलिस स्टेशनचे गुन्हा शोध पथक गस्तीवर असताना त्यांना  23 जानेवारी रोजी एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर इसम हा केज तालुक्यातील खून प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

जामखेड पोलिसांनी आरोपी राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे रा.हांगेवाडी, पोस्ट रामेश्वर ता.केज, जि.बीड  यास ताब्यात घेऊन केज पोलिसांच्या हवाली केले आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पो.उप.नि.राजु थोरात, पोना.अविनाश ढेरे, पोकॉ. संग्राम जाधव, पोकॉ. संदिप राऊत ,पोकॉ.विजय कोळी, पोकॉ. आबा आवारे, पोकॉ. अरूण पवार, पोकॉ.संदिप आजबे, पोकॉ. सचिन देवढे यांनी केली आहे.