Gold rate today : सोने – चांदीच्या भावात घसरण, किती आहे आजचा बाजार भाव जाणून घ्या..!

मुंबई: सोने – चांदीच्या भावात घसरण सुरु आहे. मे महिन्यापासून सोने – चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. त्या आधी फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये सोने- चांदीच्या भावात विक्रमी वाढ झाली होती. मे महिन्यापासून दरात घसरण असल्याने सोने- चांदीच्या खरेदीत वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने – चांदी दबावाखाली आहे. भारतीय सराफा बाजारावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे किमती घसरल्या आहेत.

Gold rate today 23 June 2023, fall in gold - silver price, know today's market price

देशांतर्गत वायदे बाजारासह सराफा बाजारात व्यवसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात आज सोने – चांदीच्या दरात घसरण पहायला मिळाली. सोन्याचे ऑगस्ट वायदे MCX वर 91 रूपयांनी घसरले, प्रति 10 ग्रॅम 58 हजार 136 इतका व्यापार होता. शुक्रवारी जागतिक बाजारात सोने चांदीच्या भावात घसरण झाली. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात शुक्रवारी घसरण पहायला मिळाली. MCX वर जुलै 2023 डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 753 रूपयांनी घसरले, 67 हजार 784 रूपये प्रति किलोवर व्यवहार सुरु होते.

22 व 24 कॅरेट सोने 400 रूपयांनी स्वस्त झाले आहे. 22 कॅरेट सोन्याचा कालचा बंद भाव 54 हजार 500 इतका होता, आज त्यात 400 रूपयांची घसरण झाली. आजचा भाव 54 हजार 100 इतका आहे. 24 कॅरेट सोन्याच्या भावात 440 रूपयांची घसरण झाली आहे. 50 हजार 20 रूपये इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे. चांदीचे दर 500 रूपयांनी घसरले आहेत. तसेच जागतिक बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात काहीशी घसरण पहायला मिळाली.