धक्कादायक: विहिरीत आढळले चौघांचे मृतदेह, मृतांमध्ये आईसह तीन चिमुकल्यांचा समावेश, पाथर्डीच्या माळीबाभुळगाव येथील घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ahmednagar Crime News : दौंड तालुक्यातील वरवंड येथील डाॅ अतुल दिवेकर यांनी आपल्या पोटच्या लेकरांची विहीरीत टाकून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाथर्डीत एकाच कुटुंबातील चौघांचे विहीरीत मृतदेह आढळून आल्याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. मृतांमध्ये आईसह दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव येथून समोर आली आहे. ( Ahmednagar Pathardi latest News)

Shocking, dead bodies of four members of same family found in well, incident at Deepak Golak Poultry Farm Malibabhulgaon in Pathardi taluka, Ahmednagar district shaken,  Malibabhulgaon Pathardi

Deepak Golak Poultry Farm : पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर कामासाठी आलेल्या नांदेड जिल्ह्यातील एका कुंटुबातील एक महीलेसह तिचा मुलगा व दोन मुली असे चौघांचे मृतदेह विहरीत सापडले आहेत. ही घटना दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहिरीत घडली आहे. पोलिसांनी मृत महीलेच्या पतीला ताब्यात घेतला आहे. चौंघाचे मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.(Pathardi MaliBabhulgaon Latest news)

पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथे फ्लाईंगबर्ड शाळेच्या पाठीमागे दिपक गोळक यांचा पोल्ट्रीफार्मचा उद्योग आहे. तेथे पाच कुटुंब व इतर पाचजण राहतात. त्यातील एक कुटूंब धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सागडे, मुलगी निषीधा व संचिता असे राहत होते. (Deepak Golak Poultry Farm Malibabhulgaon Pathardi)

धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. यावेळी इतरांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला. झोपल्यानंतर पुन्हा नवरो बायकोत वाद झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी पोल्टीफार्मवर काम करणारा एकजण विहीरीवर मोटार सुरु करायला गेला होता. तेव्हा निषीधा धम्मपाल सांगडे (दीडवर्षे) हीचा मृतदेह विहीरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्रीफार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसात खबर दिली.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, सुरेश बाबर, कृष्णा बडे असे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. विहरीत तीस ते पस्तीस फुट पाणी होते. विजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसले. तीन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे (26) , निखील धम्मपाल सांगडे(6) , संचिता धम्मपाल सांगडे (4) असे तिघांचे मृतदेह सापडले. कांचन व तिची तिनही मुले विहरीत मृत अवस्थेत सापडले.

पोलिसांनी याप्रकरणी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. चौघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. (Nishidha Dhammapal Sangde (1), Kanchan Dhammapal Sangde (26), Nikhil Dhammapal Sangde (6), Sanchita Dhammapal Sangde (4) )

धम्मपाल सांगडे (वय-३० वर्षे) हा करोडी,ता. हादगाव, जि.नांदेड येथील मुळ रहीवाशी आहे. तो बायको कांचन व एक मुलगा ,दोन मुली अशांना घेवुन दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीने काम करीत होता. धम्मपाल हा व्यसनी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी धम्मपालला ताब्यात घेतले आहे. मृत महीलेचे नातेवाईक आल्यानंतरच पुढील कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.