Jamkhed Minor Girl Rape Case : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जामखेडकर आक्रमक, तीव्र निषेध नोंदवत जामखेड ग्रामस्थांनी केली पोलिसांकडे मोठी मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Jamkhed Minor Girl Rape Case : जामखेड शहरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (बलात्कार) करणाऱ्या लिंगपिसाट शिक्षकाविरोधात जामखेड ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या या घटनेचा जामखेडकरांना आज निषेध नोंदवला. सदर घटनेचा निषेध नोंदवत जामखेडकरांनी पोलिस प्रशासनाकडे मोठी मागणी केली आहे. (Jamkhed News Today)

जामखेड तालुक्यातील साकत येथील लिंगपिसाट नराधम शिक्षक राधे उर्फ राधाकिसन जगन्नाथ मुरुमकर याने एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यासाठी घटना घडली होती, या प्रकरणी जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी शिक्षक अटकेत आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे शुक्रवारी जामखेडमध्ये पडसाद उमटले.

जामखेड ग्रामस्थांनी शुक्रवारी जामखेड पोलिस स्टेशन व जामखेड तहसील कार्यालय इथे निवेदन दिले. सदर घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली आहे त्याचा आम्ही जामखेडकर निषेध नोंदवतो, घडलेली घटना शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. आरोपी शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई कारवाई, जामखेडमध्ये पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी, विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबवाव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे.

ज्या नराधम लिंगपिसाट शिक्षकाने आष्टीच्या हर्षद लाॅजवर बलात्कार केला त्या लाॅजच्या मालकाने अल्पवयीन मुलीच्या कागदपत्रांची कुठलीही खातरजमा न करता अल्पवयीन मुलीला लाॅजवर प्रवेश दिला. आरोपीशी संगमनत करून त्याला रूम देणाऱ्या हर्षद लाॅजच्या मालकाला या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे, तसेच त्याचा हाॅटेल व लाॅज चालवण्याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करावा, अशी मोठी मागणी शुक्रवारी जामखेड ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर जामखेड शहरातील शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

नेमकी घटना काय ?

जामखेड तालुक्यातील साकत येथील लिंगपिसाट नराधम शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर वय ३० वर्षे याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीशी शाळेच्या अभ्यासाच्या माध्यमांतून स्नॅपचॅट या सोशल मिडीया साईटच्या माध्यमांतून जवळीक साधली होती. या माध्यमांतून त्याने तिच्याकडून अर्धनग्न फोटो मागवले होते. याच अर्धनग्न फोटो वापर करून नराधम शिक्षक विद्यार्थीनीला ब्लॅकमेल करत होता, सदर अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर वायरल करण्याची धमकी तो पिडीत विद्यार्थीनीला देत होता.

सदर नराधम शिक्षकाने अर्धनग्न फोटोंचा आधार घेत त्याने पिडीत अल्पवयीन मुलीस 14 जून 2023 रोजी आष्टी येथील हर्षद लाॅजवर नेले. त्या ठिकाणी लिंगपिसाट शिक्षकाने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. कुणाला काही सांगितल्यास अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची त्याने पिडीतेला धमकी दिली होती. सदर नराधम शिक्षक हा पिडीतेला जानेवारी महिन्यापासून ते 14 जून 2026 असे सहा महिन्यांपासून तीचे अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करत होता. या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात जामखेड पोलिसांत बलात्कारासह पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.