Sujit Patkar : कोविड घोटाळ्यात सुजित पाटकर सह तिघांना अटक, ईडीच्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले

मुंबई  : कोविड घोटाळ्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या सुजित पाटकर  यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीच्या रडारवर अनेक जण असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. (Covid Jumbo Centre Scam)

Covid Jumbo Centre Scam, Sujit Patkar along with three arrested in Covid scam, ED today's action, sujit Patkar latest news

लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्विसेस कंपनीकडून जंबो कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं. या कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार करण्यात आले होते. कोविड काळात जे वैद्यकीय साहित्य खेरदी करण्यात आलं होतं,त्यामध्ये अनेक गैरव्यवहार आढळून आले होते.या सर्व व्यवहारांचे तपशील अंमलबजावणी संचालनालयाला हवे होते. असा आरोप केला जातोय की कोविड सेंटरमध्ये औषधे आणि इतर उपकरणांच्या किमती वाढवून सांगण्यात आल्या होत्या. कोविड सेंटर मध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला वाटत आहेत.

http://jamkhedtimes.com/big-news-irshalwadi-irshalgad-landslide-accident-6-people-died-80-people-were-rescued-5-lakhs-were-given-to-the-heirs-of-the-deceased-chief-minister-eknath-shinde-announced-raigad-khalapur-irshalwad/

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्विसेसमध्ये सुजित पाटकर यांच्या बरोबरच आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक करण्यात आली आहे.