जामखेड टाइम्स वृत्तसेवा । डॉक्टर डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत जामखेड शहरातील साई हाॅस्पीटलचे संचालक डाॅ संजय राऊत यांनी बाजी मारत राज्यातून पहिला क्रमांक पटकावला.
ओ एस एम स्टुडिओ आणि MPCC पुणे यांच्या वतीने डॉक्टर डे निमित्त राज्यस्तरीय गायन आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून हजारो स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जामखेड येथील डॉ.संजय राऊत यांना गायन विभागात महाराष्ट्र राज्यातून प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अभिजित कदम यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण पुण्यात पार पडले. डॉ.संजय राऊत यांच्या वतीने त्यांचे बंधू डॉ. विजय व शितल राऊत यांनी हा सन्मान स्वीकारला. डाॅ संजय राऊत यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.