मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नाशिक बस अपघातातील घटनास्थळाची पाहणी, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू तर 28 जण जखमी !

Nashik Bus Accident । नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लक्झरी बस आणि आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बस पेटल्याने 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 28 प्रवाशी जखमी झाले आहे. ही घटना आज पहाटे घडली. या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

12 people died and 28 people were injured in Nashik bus accident that shook the heart, Chief Minister Eknath Shinde inspected the incident site in Nashik Bus Accident

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त ठिकाणी भेट देत घटनेची पाहणी केली तसेच जखमींची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला. त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, आ. सुहास कांदे उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनीही आज सकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती या अपघाताच्या घटनेबद्दल महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातूूही या घटनेचा शोक व्यक्त केला जात आहे. अनेक नेत्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.

12 people died and 28 people were injured in Nashik bus accident that shook the heart, Chief Minister Eknath Shinde inspected the incident site in Nashik Bus Accident

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदहून मुंबईच्या दिशेने चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रवासी बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. ही बस नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ आली आणि तिचा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारी लक्झरी बस आणि औरंगाबादच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक यांच्यात आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात (Nashik Bus Accident) घडला. चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसमधील प्रवासी साखर झोपेत होते. बसचा अपघात झालाय, हे कळेपर्यंत बसने पेट घेतला होता. बघता बघता बसच्या आतला भाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

12 people died and 28 people were injured in Nashik bus accident that shook the heart, Chief Minister Eknath Shinde inspected the incident site in Nashik Bus Accident

जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरु झाली. पण आग इतकी भडकली होती की त्यात 10 जण जिवंत होरपळले धक्कादायक बाब म्हणजे पेट घेतलेले काही प्रवासी हे रस्त्यावरही पडले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. जीव वाचवण्यासाठी प्रवाश्यांनी धडपड सुरू होती, या घटनेत अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची भीषण दृश्य पाहून मदतकार्य करण्यासाठी सरसावलेल्या स्थानिकांच्या काळजाचा थरकाप उडाला होता.

12 people died and 28 people were injured in Nashik bus accident that shook the heart, Chief Minister Eknath Shinde inspected the incident site in Nashik Bus Accident

नाशिक बस अपघातातील जखमींची नावे

१. अमित कुमार – वय ३४
२. सचिन जाधव – वय ३०
३. आश्विनी जाधव – वय २६
४. अंबादास वाघमारे – वय ४३
५. राजू रघुनाथ जाधव – वय ३३
६. निलेश प्रेमसिंग राठोड – वय ३०
७. भगवान श्रीपत मनोहर – वय ६५
८. संतोष राठोड – वय २८
९. हंसराज बागुल – वय ४६
१०. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा – वय ७९

११. त्रिशिला शहा – वय ७५
१२. भगवान लक्ष्मण भिसे – वय ५५
१३. रिहाना पठाण – वय ४५
१४. ज्ञानदेव राठोड – वय ३८
१५. निकिता राठोड – वय ३५
१६. अजय देवगण – वय ३३
१७. प्रभादेवी जाधव – वय ५५
१८. गणेश लांडगे – वय १९
१९. पूजा गायकवाड – वय २७
२०. आर्यन गायकवाड – वय ८

२१. इस्माईल शेख – वय ४५
२२. जयनुबी पठाण – वय ६०
२३. पायल शिंदे – वय ९
२४. चेतन मधुकर
२५. महादेव मारुती
२६. मालू चव्हाण – वय २२
२७. अनिल चव्हाण – वय २८
२८. दीपक शेंडे – वय ४०

या आगीत 10 ते 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गाडीतील अन्य सामान आणि प्रवाशांची माहिती घेत, प्रशासनाकडून बचावकार्य केलं जात आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातलगांना 2 लाखांची तर राज्य शासनाकडूनच 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलीय. तसंच या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातेय