Guava Benefits : तुम्हाला पेरूचे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात पेरूचे फायदे | Guava’s 10 Health Benefits
guava benefits : पेरू हे आवडीने खाल्ले जाणारे फळ, भारतात पेरूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पुर्वी पेरू विशिष्ट हंगामात मिळत असायचे, परंतू आता पेरूच्या नवनवीन जाती विकसित झाल्याने ते वर्षभर पेरू खाण्यास उपलब्ध होत आहे. पेरू हे फळ खाण्यास आंबड गोड स्वरूपात उपलब्ध असते. पेरूचे फळ जितके उपयुक्त तितकेच त्याची पाने, साल याचाही मानवी आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत. आयुर्वेदात पेरूच्या झाडाला मोठे महत्व आहे. (guava benefits in marathi)

पेरू खायला खूप रुचकर असे फळ आहे. यात मुबलक प्रमाणात पोषकतत्वे, खनिजे, फायबर असतात.याचा आरोग्यासाठी मोठा फायदा होतो. बहुगुणी पेरूचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात पेरूचे फायदे ! (Peruche Aarogyadayi Fayade)

Guava’s 10 Health Benefits : पेरूचे दहा आरोग्यदायी फायदे
1) मेंदूच्या स्वस्थ आरोग्यासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक जीवनसत्वे पेरूत आढळतात.
2) पेरूत व्हिटॅमीन B3, व्हिटॅमीन B6 मुबलक प्रमाणात असतात, याचा उपयोग मेंदूत रक्त परिसंचरण सुधारण्याबरोबरच मज्जातंतूला आराम देण्यासाठी होतो.
3) पेरूमध्ये काॅपर आढळते. याचा उपयोग थायराॅईड ग्रंथीला चांगले कार्य करण्यास फायदेशीर ठरते. तसेच हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी काॅपरचा उपयोग होतो.
4) पेरूमध्ये लाईकोपीन हे अँटीऑक्सीडंट आढळून येते. याचा उपयोग कँन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी होतो. तसेच पेशींचे नुकसान होऊ नये यासाठीही याचा उपयोग होतो.
5) पेरू हे फळ शुगर पेशंटसाठी वरदान असणारं फळ आहे. याच्या सेवनाने मधुमेही रुग्णांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते. कारण यामध्ये भरपूर फायबर असतात तसेच ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो.
6) पेरू हे फळ सतत सेवन केल्याने चेहर्यावर सुरकुत्या पडत नाहीत. त्वचेसाठी अतिशय उपयुक्त फळ आहे. पेरू सतत खाल्ल्यास आपण तरूण दिसतो. चेहर्यावरील त्वचा ताजीतवानी रहाते.
7) पेरू या फळात फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या दुर करण्यासाठी पेरूचा अहारात नेहमी समावेश करावा. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे पोटाचे आजार कमी होतात.
8) पेरूमध्ये व्हिटॅमीन ए आढळते. याचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.
9) पेरूत व्हिटॅमीन सी सुध्दा असते, यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
10) पेरू या फळात भरपूर जीवनसत्वे आणि मिनरल्स आहेत. याचे सेवन आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे नेहमी आहारात पेरूचा समावेश करावा. पेरू हे फळ दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. पेरूच्या पानांचा दातदुखीवर चांगला उपयोग होतो. दात दिखत असल्यास पेरूची कोवळी पाने चावून खाल्ल्यास दात दुखीत आराम मिळत. तसेच तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास पेरूची पाने उपयुक्त आहेत.
सुचना : सदर माहिती ही उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. याबाबत कुठलाही दावा जामखेड टाइम्स करत नाही. केवळ माहिती म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवत आहोत. धन्यवाद !