धक्कादायक : संपादकच अडकला एसीबीच्या जाळ्यात, वृध्द शेतकऱ्याकडून स्विकारली दोन लाख रूपयांची लाच, एसीबीच्या कारवाईने उडाली मोठी खळबळ !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : उस्मानाबाद (धाराशिव) (Usamanabad) जिल्ह्यातील एका 77 वर्षीय वृध्द शेतकऱ्याकडून 2 लाख रूपयांची लाच स्वीकारताना एका दैनिकाच्या संपादकासह एका खाजगी इसमाला पकडण्याची धडक कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई 15 जूलै 2023 रोजी उस्मानाबाद येथे करण्यात आली. (Usmanabad ACB Trap today)

Shockingly, Usmanabad Breaking news, editor was caught red-handed by  Osmanabad ACB while accepting bribe of two lakh rupees, Usmanabad acb trap today news, Babasaheb Andhare News,

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील 77 वर्षीय तक्रारदार पुरूषाच्या पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन पाझर तलाव व साठवण तलावासाठी शासनाने संपादित केलेली आहे. या जमिनीचा उस्मानाबाद प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन संपादित जमीनीचा अधिकचा मोबदला काढून देण्यासाठी अनिरुद्ध अंबऋषि कावळे (Aniruddha Ambrishi Kavale), वय 52 वर्षे, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद व दैनिक मराठवाडा योध्दाचा संपादक बाबासाहेब हरीशचंद्र अंधारे (Babasaheb Harishchandra Andhare – Editor of Dainik Marathwada Yoddha), वय 42 वर्षे, रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद या दोघा खाजगी इसमांनी 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. सदर लाच रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारताना दोघांना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 77 वर्षीय शेतकऱ्याच्या पत्नीची शेतजमीन पाझर तलाव व साठवण तलावासाठी शासनाकडून संपादित करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदाराच्या पत्नीला 26,56,017/- रुपये व 4,31,798/-  असे एकुण 30 लाख 87 हजार 815 रूपयांचे दोन चेक मिळणार होते. उस्मानाबाद प्रांत कार्यालयातून हे दोन चेक काढून देण्यासाठी दैनिक मराठवाडा योध्दाच्या संपादकासह एका खाजगी इसमाने दोन लाख रूपयांची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना दोघांना एसीबीने पकडले आहे.

ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे, विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांचा समावेश होता.

दरम्यान, 30 लाख 87 हजार 815 इतक्या रकमेचे चेक शेतकऱ्याला काढुन देण्यासाठी संपादकासह खाजगी इसमाने दोन लाखाची लाच उस्मानाबाद प्रांत कार्यालयातील कोणत्या अधिकाऱ्यासाठी स्विकारली होती का? याचाही शोध एसीबीकडून सुरु करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

यशस्वी सापळा कारवाई अहवाल : दि. 15/07/2023

▶️ युनिट – उस्मानाबाद

▶️ तक्रारदार – पुरुष, वय- 77 वर्षे

▶️ आरोपी -1) अनिरुद्ध अंबऋषि कावळे, वय 52 वर्षे, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद
(खाजगी इसम)
2) बाबासाहेब हरीशचंद्र अंधारे, वय 42 वर्षे, संपादक दैनिक मराठवाडा योध्दा (खाजगी इसम), रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद

➡️ लाचेची मागणी रक्कम- 2,00,000/- रुपये

➡️ लाच स्विकारली रक्कम- रुपये 2,00,000/-

➡️ लाच मागणी दिनांक – 15/07/2023

➡️ लाच स्वीकृती दिनांक – 15/07/2023

▶️  कारण – यातील तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेली शेत जमीन शासनाने पाझरतलाव व साठवण तलावा करिता संपादीत केलेली असून सदर संपादित जमिनीचा मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन तुमचे संपादित जमीनीचा मोबदला 26,56,017/- रुपये व 4,31,798/- रुपयेचा असे दोन्ही चेक काढुन देण्याकरिता 2,00,000/- रुपये लाच रकमेची  मागणी करून सदर लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

▶️  सापळा अधिकारी

विकास राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद. मो.न.9594658686

▶️ मार्गदर्शक –

1) मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो.न.9923023361
2) मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994
3) सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद. मो.न.9594658686

➡️ सापळा पथक

पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे, विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा कार्यालय 02472- 222879 टोल फ्री क्रमांक.1064