Bakri Eid 2023 : बकरी ईदच्या सार्वजनिक सुट्टीत बदल, शासनाने जारी केली अधिसूचना

पुणे : शासकीय सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये बकरी ईदची (Eid-ul-Adha) सार्वजनिक सुट्टी 28 जून 2023 रोजी आहे. मात्र, यंदा बकरी ईद (bakri eid 2023) ही गुरुवारी असल्याने 28 जूनची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती 29 जून 2023 (bakri eid 2023 date) करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी आज जारी केला आहे.

Change in public holiday of Bakri Eid 2023, notification issued by maharashtra Government, bakri eid 2023 date

शासनाने 2023 मध्ये जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांमध्ये बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी बुधावारी  (28 जून 2023) दर्शविण्यात आली आहे. मात्र, यंदाची बकरी ईद ही 29 जून 2023 रोजी येत आहे. त्यामुळे 28 जूनची सार्वजनिक सुट्टी आता 29 जून रोजी करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.