Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी,कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Agriculture News: जूनच्या शेवटच्या आठवडय़ात मान्सून महाराष्ट्रात सक्रीय झाला आहे. अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात दमदार पाऊस झालेला नाही. रिमझिम पावसाच्या बळावर शेतकऱ्यांनी खोळंबलेल्या पेरण्या (sowing 202) सुरू करण्याची तयारी हाती घेतलीय. अश्यातच राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण (Sunil Chavhan IAS) यांनी शेतकऱ्यांना महत्वाचे अवाहन केलं आहे.

Agriculture Commissioner Sunil Chavan gave important advice to farmers regarding sowing 2023, Important news for farmers, Agriculture Latest news,

कृषि आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले की, राज्यात 21 जून पासून पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडलाय. यंदा अत्तापर्यंत फक्त 25 टक्के पाऊस झालाय. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात अत्तापर्यंत फक्त 2 लाख 47 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्यासह अनेक भागात पाऊस कमी आहे. जो पर्यंत शेतात खोलवर ओल होत नाही तोवर पेरण्यांसाठी घाई करू नये, असे महत्वाचं अवाहन त्यांनी केलं आहे.

त्याचबरोबर कृषि आयुक्त पुढे म्हणाले की, राज्यात मान्सून येत्या काही दिवसांत जोरदार हजेरी लावणार आहे. हवामान विभागाकडून सकारात्मक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. चिंता करण्याचं कारण नाही, राज्यात बियाणे आणि खते व किटकनाशकांचा मुबलक साठा आहे. परंतू हे मिळवण्यात अडचणी आल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा, असेही अवाहन त्यांनी केलं आहे.

राज्यात उद्या 27 व 28 जून रोजी काही भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण व नाशिक या भागात हा पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यातही दमदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक भागांना ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात आला आहे.