चंद्रयान 3 मराठी माहिती : चंद्रयान 3 कुठे आहे? इस्त्रोने दिली महत्वाची माहिती । Chandrayaan-3 Mission update

नवी दिल्ली  : करोडो भारतीयांचं स्वप्न असलेल्या आणि संपुर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चंद्रयान- 3 मोहिमेची (Chandrayaan-3 Mission) शुक्रवारी सुरुवात झाली.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Center Sriharikota) येथून चंद्रयान-3 चे शुक्रवारी दुपारी यशस्वी उड्डाण केले. MVM3 M4 या बाहुबली राॅकेटच्या माध्यमांतून चंद्रयान-3 अवकाशात पोहचले आणि इस्त्रोने (Indian Space Research Organisation) पहिली टेस्ट पास केली. चंद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणानंतर सध्या  चंद्रयान-3 नेमकं कुठे आहे? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आता इस्त्रोने याबाबत एक चांगली बातमी दिली आहे. (Chandrayaan-3 Mission update)

Chandrayaan 3 Marathi Information, Where is Chandrayaan-3 ? ISRO gave important information, Chandrayaan-3 Mission update,

चंद्रयान-3ची कक्षा यशस्वीपणे बदलली गेली आहे. (चंद्रयान-3 ने पहिले ऑर्बिट मॅन्यूवरींग यशस्वीपणे पार केले) यामुळे त्याचे अंतर वाढवण्यात आले. सध्या चंद्रयान-3 हे 42 हजार किलोमीटर अंतरावर आहे. ठरलेल्या नियोजनानुसार चंद्रयान-3 ही मोहिम सुर आहे, असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. कक्षेत बदल झाल्यानंतर चंद्रयान-3 अंतराळयान आता 41762 किमी x 173 किमी कक्षेत आहे.

Chandrayaan 3 Marathi Information, Where is Chandrayaan-3 ? ISRO gave important information, Chandrayaan-3 Mission update,
Photo credit : ISRO

चंद्रयान-3 ला MVM3 M4 या बाहुबली राॅकेटच्या माध्यमांतून पृथ्वीच्या अंडाकृती कक्षेत सोडण्यात आले होते. त्याचे पृथ्वीपासून कमीत कमी अंतर 179 किलोमीटर तर जास्तीत जास्त अंतर 36 हजार 500 किलोमीटर अंतर असणार आहे. हे अंतर 42 हजार किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आले.

Chandrayaan 3 Marathi Information, Where is Chandrayaan-3 ? ISRO gave important information, Chandrayaan-3 Mission update,
Photo credit : ISRO

अशी कामगिरी करणारा भारत ठरणार चौथा देश

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने शुक्रवारी आपली तिसरी चंद्रयान-3 मोहिम सुरू केली. दुसऱ्या चंद्रयान मोहिमेतील त्रुटी दुर करत तिसऱ्या चांद्र मोहिमेला आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून प्रारंभ झाला. चंद्राच्या भूमीवर चंद्रयान-3 उतरवण्याचा प्रयत्न यशस्वा झाल्यास भारताची ही चांद्रमोहिम ऐतिहासिक ठरणार आहे. चंद्राच्या भूमीवर अमेरिका, रशिया आणि चीन नंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरेल.

Chandrayaan 3 Marathi Information, Where is Chandrayaan-3 ? ISRO gave important information, Chandrayaan-3 Mission update,
Photo credit : ISRO

चंद्रयान-3 चे चंद्रावर लँडींग कधी होणार?

इस्त्रो गेल्या 15 वर्षांपासून चांद्र मोहिमेवर काम करत आहे. 15 वर्षांत इस्त्रोची ही तिसरी चांद्र मोहिम असणार आहे. चंद्रयान-3 चे स्वाॅप्ट लँडींग 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजून 47 मिनटांनी करण्याची योजना इस्त्रोने आखली आहे. त्यानुसार चंद्रयान 3 चे स्वाॅप्ट लँडींग होणार आहे.

चंद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्टे काय ?

चंद्राच्या भूमीवर चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. तसेच चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणे आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणे ही यामागची उद्दिष्ट्ये आहेत. याआधी चांद्रयान-२ मोहिमेत भारताने लँडर चंद्राच्या भूमीवर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा अपयश आले होते.