ADR Organization Report : महाराष्ट्रातील 422 लोकप्रतिनिधींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, एडीआर संस्थेच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड
पुणे : सन २००४ पासून २०२३ पर्यंत राज्यातील विविध पक्षाचे उमेदवार आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिज्ञापत्रांचे एडीआर संस्थेने सर्व्हेक्षण केले.या सर्व्हेक्षणाचा अहवाल समोर आला असून यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये २००४ पासून राज्यातून निवडून आलेल्या १ हजार ३२६ आमदार, खासदारांमधून तब्बल ४२२ (३२ टक्के) लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर ७१५ (५४ टक्के) लोकप्रतिनिधींवर किरकोळ गुन्हे दाखल असल्याची माहिती सर्व्हेक्षणात समोर आली आहे. (Serious crimes against 422 public representatives in maharashtra)
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (Association for Democratic Reforms) (एडीआर) या संस्थेने मागील चार सार्वत्रिक निवडणुकीच्या (General Election) रिंगणात उतरलेल्या विविध पक्षांच्या उमेदवार आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिज्ञापत्रांचा सर्वे केला आहे. या सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींवर दाखल असलेल्या गंभीर आणि किरकोळ गुन्ह्यांची माहिती एडीआर संस्थेने उजेडात आणली आहे.आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha, Assembly Elections) पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना मतदार जागा दाखवतील का हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.
पुणे येथील गोखले इन्स्टीट्यूटच्या (Gokhale Institute, Pune) काळे सभागृहातराजकीय परिस्थिती आणि निवडणुकांवर विचारमंथन यावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत एडीआर संस्थेने आपला अहवाल सादर केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. नसीम झैदी (Former Commissioner Central Election Commission Dr. Naseem Zaidi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी निवृत्त मेजर अनिल वर्मा (Retired Major Anil Verma), एडीआरचे अध्यक्ष प्रा. त्रिलोचन शास्त्री (President of ADR Prof. Trilochan Shastri), संस्थापक सदस्य डॉ. अजित रानडे (Dr. Ajit Ranade) सह आदी उपस्थित होते.
या परिषदेत देशभरातील आजी-माजी निवडणूक आयोगाचे अधिकारी, बिहार, गोवा राज्यातील माजी मंत्री, तसेच राजकीय विश्लेषक, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. रानडे यांनी दिली.
एडीआर संस्थेकडून पक्षनिहाय अब्जाधिश, कोट्यावधी संपत्ती असणारे उमेदवार, त्यांच्यावर असणारे गंभीर गुन्हे, राजकीय पंक्षाला मिळणारा निधी, त्यांच्या विजयाचे मार्ग, लोकप्रतिनिधींची शैक्षणिक पात्रता, महिला पुरुष लोकप्रतिनिधींचे वर्गीकरण आदी सर्व विषयांवर विस्तृत सर्व्हेक्षण केले आहे. राजकारणातील अस्थिरता आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे मतदारांमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली असल्याचे मत परिषदेत व्यक्त करण्यात आले.