Buldhana Bus Accident Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घटनास्थळाची पाहणी, बुलढाणा बस अपघातातून बचावलेला प्रवाशी म्हणाला, आम्ही खाली उडी मारताच….

बुलढाणा, 1 जूलै 2023  : Buldhana Bus Accident Live Update : बुलढाणा बस अपघाताच्या घटनेने शनिवारी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. या अपघातात 26 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवाशी या अपघातातून बचावले आहेत. या अपघातात बचावलेल्या एका प्रवाश्यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधला.

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected Buldhana bus accident site, passenger who survived Buldhana bus accident said As soon as we jumped down

समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा हद्दीत मध्यरात्री झालेल्या खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. समृद्धी महामार्गावर झालेला हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या अपघाताची भीषणता मोठी आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. (Buldhana Bus Accident Live Update)

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected Buldhana bus accident site, passenger who survived Buldhana bus accident said As soon as we jumped down

समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. उपलब्ध यंत्रणा, पोलीस प्रशासन त्यांच्यामार्फत तात्काळ मदत पोहोचली. मात्र स्लीपर कोच बसचा मुख्य दरवाजा बंद असल्याने दुर्दैवाने अनेकांना वाचवता आले नाही. या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जाईल, त्यावर उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (Buldhana Bus Accident latest Update)

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected Buldhana bus accident site, passenger who survived Buldhana bus accident said As soon as we jumped down

योगेश रामदास गवई हा तरूण या भीषण दुर्घटनेतून बचावला आहे. या घटनेबाबत माहिती देताना तो म्हणाला की, मी नागपूरहून औरंगाबादसाठी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये चढलो. समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर बस पलटी होऊन लगेचच पेटली. 3-4 जण खिडकी तोडून पळून गेले, काही वेळातच बसमध्ये स्फोट झाला. यावेळी मी एका मुलाल वर खेचले. तो वाचला. आम्ही खाली उडी मारताच ट्रॅव्हल्सचा स्फोट झाला. यावेळी आम्ही तेथून दूर पळालो.”

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected Buldhana bus accident site, passenger who survived Buldhana bus accident said As soon as we jumped down

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने सांगितले की, “माझ्या शेजारी बसलेला प्रवासी आणि मी मागील खिडकी तोडून बाहेर आलो. बसची खिडकी तोडून चार ते पाच प्रवासी बाहेर आले, मात्र इतर प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. एका स्थानिक नागरिकाने सांगितले. “अपघातानंतर लोकांनी महामार्गावरील इतर वाहनांची मदत मागितली. मात्र कोणीही थांबले नाही.”

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected Buldhana bus accident site, passenger who survived Buldhana bus accident said As soon as we jumped down

नेमकी घटना काय ?

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळखूटा शिवारात आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात बस जळून खाक झाली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत २६ जीवंत माणसं जळून खाक झाली. या दुर्दैवी भीषण घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Buldhana Bus Fir)

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected Buldhana bus accident site, passenger who survived Buldhana bus accident said As soon as we jumped down

यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्र.MH29 BE1819 ही यवतमाळ येथून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्र.३३२ जवळ रात्री १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस दुभाजकाला धडकून उलटली. यानंतर लगेच बसने पेट घेतला.

यावेळी पाच प्रवाशी व ट्रॅव्हल्सचे तीन कर्मचारी असे आठजण तात्‍काळ बसमधून बाहेर पडले. अन्य २६ प्रवाशी रात्रीच्या गाढ झोपेत असल्याने व बसने मोठा पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा जळून घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताची बातमी कळल्यानंतर पोलीस, अग्नीशमन दल आदी यंत्रणा मदतीसाठी धावल्या. परंतू बसमध्ये आगीने रौद्र रूप धारण केल्‍याने सर्व हतबल झाले. ते बसमधील प्रवाशांना वाचवू शकले नाहीत. आगीत होरपळलेल्या प्रवाशांचा आकांत ह्रदयाला पिळवटून टाकणारा होता. आरोग्य विभाग व पोलीसांनी सर्व मृतदेह बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत.

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected Buldhana bus accident site, passenger who survived Buldhana bus accident said As soon as we jumped down

या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या आठ जणांवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मृतांची नावे मिळवण्याचे व ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात मोबाईल क्र.7020435954 आणि 07262242683 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अपघातातील जखमी व्यक्तींची नावे (चालक)-शे.दानीश शे.ईस्माईल या.दाव्हा जि.यवतमाळ, (क्लिनर) संदीप मारोती राठोड (३१) रा तिवसा, योगेश रामराव गवई रा.औरंगाबाद., साईनाथ चरमसिंग पवार (१९) रा माहूर, शशिकांत रामकृष्ण गजभिये या.पांढरकवडा, पंकज रमेशचंद्र रा.कांगडा (हिमाचल प्रदेश) या अपघातातील बसचा चालक व क्लिनर या दोघांना सिंदखेडराजा पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली

बुलढाणा बस अपघातातील मृतांमध्ये नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये आयुष गाडगे, कौस्तूभ काळे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयातून पोलीस प्रवाशांची माहिती घेत आहे. इतर मृतांची ओळख पटवण्याचे कामे सुरु आहे.