छत्रपती संभाजीनगर | 8 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीने सर्वात मोठा धक्का दिला आहे. ईडीने कन्नड साखर कारखान्यावर सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई मुळे रोहित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती.
ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्नड साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. रोहित पवार यांच्या कंपनीच्या मालकीच्या साखर कारखान्याची 50 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेल्या त्या कारवाईमुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची यापूर्वी अनेकदा ईडी चौकशी झाली आहे. मुंबईतल्या ईडी ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवार यांचीही ईडी चौकशी झाली होती. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी 24 जानेवारीलाही त्यांची 12 तास चौकशी झाली होती. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट आक्रमक झाला होता.
दरम्यान, ईडीने आज रोहित पवार यांना जोरदार धक्का देत मोठी कारवाई केली आहे. ED कडून बारामती अॅग्रोच्या प्रॉपर्टीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 161 एकर जागा ED ने जप्त केली आहे.जपवळपास 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ही कारवाई करण्यात आली आहे. बारामती अॅग्रो ही कंपनी आमदार रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या (Baramati Agro Ltd) संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED Action On Rohit Pawar In PMLA Case) ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.