ब्रेकिंग न्यूज : माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सुन भाजपात दाखल, काँग्रेसला मराठवाड्यात सर्वात मोठा धक्का । Dr Archana Patil Chakurkar join BJP

Dr Archana Patil Chakurkar join BJP : एकिकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच काँग्रेसला (congress) मराठवाड्यात आज मोठा राजकीय धक्का बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil chakurkar) यांच्या सुनबाई  डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. (dr archana patil chakurkar latest news today)

Breaking News, Former Union Home Minister shivraj Patil Chakurkar's son-in-law joins BJP, biggest blow to Congress in Marathwada, Dr Archana Patil Chakurkar joined BJP,

डाॅ अर्चना पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर अर्चना पाटील ह्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर शनिवारी दुपारी डाॅ अर्चना पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अर्चना पाटील यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशामुळे भाजपला लातुर जिल्ह्यात बळकट झाली आहे.