ब्रेकिंग न्यूज : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत तुफान राडा, बाचाबाची, मारामारी, नेमकं कारण काय ? जाणून घ्या सविस्तर !

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा उमेदवार निवडीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज जोरदार राडा झाला.मराठा समाजाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची सुरुवात शांततेत झाली मात्र त्यानंतर उमेदवार कोणता द्यावा यावरून जोरदार वाद उफाळून आला. यावेळी गटातटात मारामारी, बाचाबाची आणि मारहाण झाल्याचेही समोर आले आहे. अचानक उफाळून आलेल्या वादावादीमुळे बैठकीत मोठा गोंधळ उडाला होता.

Breaking News, In Chhatrapati Sambhajinagar Maratha community meeting, there was a storm, quarrels, fights, what is the real reason?,

संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा समाजाने लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत उमेदवार ठरवताना वाद झाला. एकमत न झाल्याने हा वाद विकोपाला गेला आणि एकमेकांवर हल्लाही झाला. कोणताही उमेदवार निवडण्यासाठी नाव समोर आलं नाही. पण समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी इतर उपस्थितांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली. एका नावावर एकमत होत नव्हतं यातून ही हाणामारी झाल्याची माहिती समोर येतेय. आपल्या उमेदवाराचं नाव द्यावं असं अनेकांचं मत होतं. या बैठकीला महिलासुद्धा उपस्थित होत्या.

छत्रपती संभाजीनगर येथे आज मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला 60 ते 70 समाज बांधव उपस्थित होते. सुरुवातीला बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला.

आरोपानंतर विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. बाळू औताडे या तरुणाकडून सुरुवातीला मारहाण झाली. त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण केली. मारहणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ राडा सुरू होता. राडा झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. या राड्यानंतर महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत आहे. कोणी कोणाच नाव घेऊन बोलायच नाही, असं ठरलेलं. मात्र तरीही काही नाव घेण्यात आली. त्यावरुन ही सर्व वादावादी, हाणामारी झाली असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. काही मतभेद असतील, तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायच असं ठरलेलं. मात्र काही जणांची नाव पुकारण्यात आली, त्यावरुन वादावादी झाली, असं बैठकीत सहभागी असलेल्यांनी सांगितलं.