Amravati bus accident : अमरावतीच्या चिखलदरा जवळ प्रवाशांसह बस कोसळली दरीत, एसटी बसच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी, बचाव कार्य वेगाने सुरु

Amravati bus accident today : ऐन होळीच्या दिवशी विदर्भातून भीषण अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७ सी ९४७८ या बसला अमरावती जिल्ह्यतील चिखलदरा जवळ भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी बस दरीत कोसळण्याची भीषण घटना घडली आहे. एसटी बसमधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समजते.तर 36 जण जखमी झाले असून यातील 5 जण गंभीर जखमी आहेत. (Amravati bus accident news)

Breaking News, Amravati bus accident news today, bus with passengers fell into a valley near Chikhaldara in Amravati, three died and many others injured in a terrible accident of ST bus, rescue operations are on fast.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर एसटी बस दरीत कोसळली. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते. ही बस परतवाडा ते तुकईथळ इथं जात होती. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. (Amravati bus accident news)

परतवाडा आगाराची ही बस असून रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बसचा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह एसटी बसमध्येच अडकले असून ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जवाहर कुंड इथं वळणावर ३० फूट खोल दरीत बस कोसळली. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आळं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने राबवलं जात आहे. (Amravati bus accident news today )

अमरावती वरून मध्यप्रदेशच्या तुकईथड येथे निघालेली परतवाडा आगाराची बस रविवारी सकाळी 11:30 वाजता जवाहर कुंड येथे घाट वळणावर अचानक अनियंत्रित झाल्याने 30 फूट खोल दरीत कोसळली.त्यात दोन महिला ठार तर 36 पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Amravati bus accident latest news today )

इंदू समाधान गंत्रे (65) रा साठमोरी ता खकणार मध्यप्रदेश, ललिता चिमोटे (30 ) बुरडघाट, अशी मृतांची नावे आहेत.आरोग्य यंत्रणेच्या वतीने तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सीमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर ओमप्रकाश तिवारी सुनील येवले शिवा काकड प्रदीप सेमलकर, लाला कासदेकर बाबू दहीकर असे सेमाडो येथील अनेक जण मदतीला धावले.अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७ सी ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा घटांग सेमाडोह धारणी तूकईथड जात असताना हा अपघात झाला. (Amravati bus accident news today )