Breaking News : शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशाच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. NDA ची दिल्लीत पर UPAची बंगलोर मध्ये बैठक पार पडणार आहे.अश्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे.मुंबईत रविवारपासून जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत.अजित पवार गटाने सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरला भेट घेतली.या भेटीनंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठी घोषणा केली आहे.

Breaking news Ajit Pawar group meets Sharad Pawar for second day in row, Praful Patel's big announcement, maharashtra politics latest update,

मागील 15 दिवसांपुर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा फडकावत शिवसेना – भाजप युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. खातेवाटपही झाले. आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात शरद पवार गटाकडे किती आमदार असणार? अजित पवार गटाकडे किती आमदार असणार ? याची राज्याला उत्सुकता लागली होती. परंतू राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी अधिवेशनाला दांडी मारल्याने राजकीय सस्पेन्स कायम आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार गटाच्या सर्व मंत्री व नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. अधिवेशनाचा पहिला दिवस तहकूब करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे हे नेते पुन्हा शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झाले होते. या भेटीवर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज अजित पवार, सुनील तटकरे आणि मी शरद पवार यांची YB चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. आम्ही त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्र ठेवण्याची विनंती केली आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले पण त्यावर ते काहीही बोलले नाही, असे पटेल म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मोठी घोषणा केली आहे. उद्या दिल्लीतील हाॅटेल अशोका येथे होणाऱ्या NDA च्या बैठकीसाठी मी अजित पवारांसह बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी घोषणा केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे UPA च्या उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. एकुणच घडत असलेल्या घडामोडीनुसार राष्ट्रवादीतील उभी फुट आता निर्णायक वळणावर आली असल्याचे स्पष्ट संकेत सध्या सुरु असलेल्या घडामोडीवरून दिसत आहे.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवार यांची भेट घेणाऱ्या अजित पवार गटातील आमदारांसह एकुण 32 आमदारांनी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, सर्व आमदारांनी शरद पवार साहेबांचा आशिर्वाद घेतला. कालची सारखीच विनंती केली. पक्ष एकसंध रहावा यासाठी शरद पवारांना विनंती केली. त्यांनी काल आणि आज आमचं म्हणणं ऐकुन घेतलं, पण ते काही बोलले नाहीत असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.