खुशखबर ! जामखेडमध्ये लवकरच सुरू होणार कांदा मार्केट, जामखेड बाजार समितीच्या वतीने जोरदार हालचाली सुरू, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यात कांद्याचे (Onion production) मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion farmers) कांदा विक्रीसाठी जामखेड शेजारील बाजार समित्यांसह खाजगी व्यापाऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. जामखेड (Jamkhed) तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीची हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जामखेड बाजार समितीच्या वतीने कांदा मार्केट (Onion Market) सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. (Jamkhed Market Committee)

Good news,Onion market will start soon in Jamkhed, strong movement on behalf of Jamkhed market committee, happy atmosphere among farmers,Agriculture news,

जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी अहमदनगर, करमाळा मिरजगाव, कडा, बार्शी, सोलापुर, पुणे, बीड या बाजारपेठेचा आधार घ्यावा लागतो, त्यासाठी वाहतुक व इतर खर्च मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी कांदा उत्पादन खर्च, वाहतुक व इतर खर्च यातच अधिक खर्च होत असल्याने कांदा उत्पादकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असायचे. याचाच विचार करून जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जामखेडमध्ये कांदा मार्केट सुरू करण्यासाठी सभापती शरद कार्ले आणि संचालक मंडळाने पुढाकार घेतला आहे.

Good news,Onion market will start soon in Jamkhed, strong movement on behalf of Jamkhed market committee, happy atmosphere among farmers,Agriculture news,

जामखेड बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या कांदा मार्केटसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणी कांदा मार्केट साठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय या मार्केटमध्ये सोलापुर, अहमदनगर, कडा व  शेजारील कांदा बाजारपेठेतील मोठे व्यापारी जामखेडमध्ये येणार आहेत. यामुळे अहमदनगर, सोलापुर इतर मोठ्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला जो भाव दिला जातो, तोच भाव जामखेडच्या कांदा मार्केटमध्ये दिला जाणार आहे.यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाहतुक खर्च वाचून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. जामखेड बाजार समितीने जामखेडमध्ये कांदा मार्केट सुरु करण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.

दरम्यान, जामखेडमध्ये कांदा मार्केट सुरु करण्याकरिता कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची पाहणी करण्यासाठी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, राहूल बेदमुथ्था यांनी आज कडा बाजार समितीतील कांदा मार्केटची पाहणी केली. यावेळी त्यांनी कडा कांदा मार्केटमधील व्यापाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत जामखेड कांदा मार्केटमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. सर्व सुविधा देऊ असे अश्वासन यावेळी सभापती कार्ले यांनी व्यापाऱ्यांना दिले. यावेळी जामखेड बाजार समितीत सुरु होणाऱ्या कांदा मार्केटमध्ये येण्यास कांदा व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली.

Good news,Onion market will start soon in Jamkhed, strong movement on behalf of Jamkhed market committee, happy atmosphere among farmers, Agriculture news,

“आमदार प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले व सत्ताधारी भाजपचे संचालक मंडळ जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जामखेड बाजार समितीच्या माध्यमांतून नवनवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यातून दिसत आहे. जामखेडमध्ये कांदा मार्केट सुरू करताना आवश्यक असलेल्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जामखेड बाजार समितीने कंबर कसली आहे. जामखेड बाजार समितीने कांदा मार्केट सुरु करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.”