जामखेड : 28 जानेवारी रोजी जामखेड शहरातील महिलांसाठी भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन, महिलांना हजारो रूपयांच्या पैठणी जिंकण्याची संधी, भाजपा शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांचा पुढाकार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजपाचे जामखेड शहराध्यक्ष बिभीषण मामा धनवडे आणि जगदंबा महिला मंडळ यांच्या वतीने येत्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जामखेड येथील ल.ना.होशिंग विद्यालयाच्या मैदानात खास महिला वर्गासाठी भरगच्च अश्या भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, माजी सभापती आशाताई राम शिंदे, धनश्रीताई सुजय विखे-पाटील उपस्थित राहणार आहेत. मकरसंक्रांती निमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाचा जामखेड शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे अवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक बिभीषण (मामा) धनवडे यांनी केले आहे.

मकर संक्रांतीनिमित्त भाजपाचे जामखेड शहराध्यक्ष बिभीषण मामा धनवडे आणि जगदंबा महिला मंडळ यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम, खेळ पैठणीचा तसेच महिलांचा सन्मान तसेच न्यु होम मिनिस्टर अश्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभिनेता क्रांती ( नाना) मळेगांवकर यांच्या गप्पा, गोष्टी, रंजक खेळासोबत गावरान काॅमिडीचा तडका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी  बालगायिका सह्याद्री मळेगांवकर ह्याही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी पहिले बक्षिस १२ हजार ५५१ रूपये किंमतीची पैठणी, दुसरे बक्षीस ७००० रुपये किमतीची पैठणी, तर तिसरे बक्षीस पाच हजार रुपये किमतीची पैठणी, चौथे बक्षीस २१०० रूपयांची पैठणी, तर पाचवे बक्षीस १५०० रूपयांची पैठणी असणार आहे. या कार्यक्रमासाठी  महिलांना मोफत प्रवेश असेल. सहभागी महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे जामखेड शहराध्यक्ष बिभीषण (मामा) धनवडे यांनी केले आहे.