मोठी बातमी : इर्शाळवाडी – इर्शाळगड दरड दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 80 जणांना वाचवण्यात यश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा | Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS : माळीण व तळीये दुर्घटनेची आठवण जागी करणारी दुर्दैवी घटना बुधवारी रात्री रायगड (Raigad Landslide) जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातून समोर आली आहे. खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (irshalwadi Irshalgad Landslide) (इर्शाळगड ) या ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावावर डोंगर (दरड) (khanapur Landslide) कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत सहा जणांचे प्राण गेले आहेत. या भागात वेगाने बचाव कार्य सुरु आहे.अत्तापर्यंत 80 जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असून मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांच्या वारसांना 5 लाख रूपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Big news, Irshalwadi - Irshalgad Landslide accident 6 people died, 80 people were rescued, 5 lakhs were given to the heirs of the deceased, Chief Minister Eknath Shinde announced, Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं केलं आहे. NDRF च्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

Big news, Irshalwadi - Irshalgad Landslide accident 6 people died, 80 people were rescued, 5 lakhs were given to the heirs of the deceased, Chief Minister Eknath Shinde announced, Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील चार सहकारी होते. मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून त्यांची आस्थेने विचारपूस केली, त्यांना धीर दिला. आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.

Big news, Irshalwadi - Irshalgad Landslide accident 6 people died, 80 people were rescued, 5 lakhs were given to the heirs of the deceased, Chief Minister Eknath Shinde announced, Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Big news, Irshalwadi - Irshalgad Landslide accident 6 people died, 80 people were rescued, 5 lakhs were given to the heirs of the deceased, Chief Minister Eknath Shinde announced, Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

खालापूर येथील इर्शाल गडावरील चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात आदिवासी वस्तीवर दरड कोसळल्याने भयंकर दुर्घटना घडली आहे. रात्री गावातील लोक झोपलेले असतानाच डोंगर कडा तुटल्याने संपूर्ण गाव या डोंगर कड्याखाली दबला गेला. या दुर्घटनेत आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर दरडीखाली 50 ते 60 घरे आणि तब्बल 100 ते 200 लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 80 लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे.

काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 250 ते 300 लोक वस्तीचं हे गाव आहे. आदिवासी ठाकूर समाजाची ही वस्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले होते. काल रात्री सर्वजण झोपेत असताना अचानक दरड कोसळल्याने या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली गेली आहेत. रात्री हा प्रकार घडल्याने एनडीआरएफची दोन पथके, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रेस्क्यू टीमला मदतकार्यात मदत केली.

Big news, Irshalwadi - Irshalgad Landslide accident 6 people died, 80 people were rescued, 5 lakhs were given to the heirs of the deceased, Chief Minister Eknath Shinde announced, Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

इर्शालगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. चिखल तुडवत आणि डोंगर चढत जात असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका अग्निशमन दलाच्या जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. इतर जवानांनी या जवानाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जवानाला मृत घोषित केले.

Big news, Irshalwadi - Irshalgad Landslide accident 6 people died, 80 people were rescued, 5 lakhs were given to the heirs of the deceased, Chief Minister Eknath Shinde announced, Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

अंधारामुळे मदत कार्यास अडचणी

दरम्यान, रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. मात्र, तरीही रेस्क्यू टीमने रात्रभर जागून मदतकार्य केले. पहाट होताच पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी पोहोचले आहेत. तर गिरीश महाजन हे पहाटे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे काही वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत.

आक्रोश आणि मातम

दरम्यान, ही घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाडीतील लोकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बदलापूरहूनही एक कुटुंब आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आलं आहे. अनेकांच्या नातेवाईकांनी तर घटनास्थळी येताच समोरचं दृश्य पाहून टाहो फोडला. या दुर्घटनेत कुणाची मुलगी, कुणाचा जावई, कुणाचा मुलगा तर कुणाचे आईवडील दगावले आहेत.

लहान मुले दगावल्याची भीती

या गावात अनेक लहान मुले होती. ही मुले रात्री झोपी गेली होती. डोंगर कडा कोसळल्याने मोठ्या माणसांना पळ काढता आला. पण लहान मुलांना पळता आलं नाही. त्यामुळे या दुर्घटनेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर दगावल्याचं सांगितलं जात आहे.

Big news, Irshalwadi - Irshalgad Landslide accident 6 people died, 80 people were rescued, 5 lakhs were given to the heirs of the deceased, Chief Minister Eknath Shinde announced, Raigad Khalapur irshalwadi Irshalgad Landslide Latest NEWS

भूस्ख्खलन झालेल्या इरशाळगड ठाकूरवाडी येथे मंत्री गिरीश महाजन , मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे यांची भेट देऊन आढावा घेतला. या अनुषंगाने मदत कार्याची घेतली माहिती घेऊन प्रशासन व पोलीस मदत कार्यात गुंतलेल्या यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने सूचना दिल्या आहेत. दुर्घटनेनंतर अलिबाग, खोपोली , कर्जत , लोणावळा , बदलापूर , पनवेल ,वाशी व मुंबई येथून मदत पथके रवाना झाली. ८ ॲम्बुलन्स, 44 अधिकारी कर्मचारी,2 जेसीबी पनवेल नगरपालिका येथून पाठविण्यात आले आहे. कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आहे.दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंति हॅकर्स हे देखील या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटना हेल्पलाईन नंबर

खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड दुर्घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी API काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड  कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून खालापूरनजीक इरशाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजीक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेची माहिती मिळतात मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झालो असून मदत आणि बचावकार्यावर लक्ष ठेवून आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.