Raigad Khalapur Irshalgad Landslide : माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती, इर्शाळवाडी-इर्शाळगड गावावर कोसळला डोंगर, 5 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले मातीच्या ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव

रायगड : Raigad Khalapur Irshalgad Landslide : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढल्या आहे. या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. माळीण व तळीये दुर्घटनेची आठवण जागी करणारी अशीच एक दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातून उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalgad) (इर्शाळगड ) या गावावर डोंगर (दरड) (Landslide) कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

या घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 ते 200 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. NDRF व प्रशासनाने हाती घेतलेल्या मदतकार्यात अत्तापर्यंत 75 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

खालापूर येथील इर्शाल गडावरील चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात आदिवासी वस्तीवर दरड कोसळल्याने भयंकर दुर्घटना घडली आहे. रात्री गावातील लोक झोपलेले असतानाच डोंगर कडा तुटल्याने संपूर्ण गाव या डोंगर कड्याखाली दबला गेला. या दुर्घटनेत आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर दरडीखाली 50 ते 60 घरे आणि तब्बल 100 ते 200 लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 25 लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 250 ते 300 लोक वस्तीचं हे गाव आहे. आदिवासी ठाकूर समाजाची ही वस्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले होते. काल रात्री सर्वजण झोपेत असताना अचानक दरड कोसळल्याने या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली गेली आहेत. रात्री हा प्रकार घडल्याने एनडीआरएफची दोन पथके, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रेस्क्यू टीमला मदतकार्यात मदत केली.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

इर्शालगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. चिखल तुडवत आणि डोंगर चढत जात असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका अग्निशमन दलाच्या जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. इतर जवानांनी या जवानाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जवानाला मृत घोषित केले.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

अंधारामुळे मदत कार्यास अडचणी

दरम्यान, रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. मात्र, तरीही रेस्क्यू टीमने रात्रभर जागून मदतकार्य केले. पहाट होताच पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी पोहोचले आहेत. तर गिरीश महाजन हे पहाटे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे काही वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

आक्रोश आणि मातम

दरम्यान, ही घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाडीतील लोकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बदलापूरहूनही एक कुटुंब आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आलं आहे. अनेकांच्या नातेवाईकांनी तर घटनास्थळी येताच समोरचं दृश्य पाहून टाहो फोडला. या दुर्घटनेत कुणाची मुलगी, कुणाचा जावई, कुणाचा मुलगा तर कुणाचे आईवडील दगावले आहेत.

लहान मुले दगावल्याची भीती

या गावात अनेक लहान मुले होती. ही मुले रात्री झोपी गेली होती. डोंगर कडा कोसळल्याने मोठ्या माणसांना पळ काढता आला. पण लहान मुलांना पळता आलं नाही. त्यामुळे या दुर्घटनेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर दगावल्याचं सांगितलं जात आहे.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेची माहिती मिळतात मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झालो असून मदत आणि बचावकार्यावर लक्ष ठेवून आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

इर्शाळवाडी दुर्घटना हेल्पलाईन नंबर

खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड दुर्घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी API काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड  कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत.

Raigad Khalapur Irshalgad Landslide latest news, repeat of Malin and Taliya, mountain collapsed on Irshalwadi-Irshalgad village, 5 people died, many people were trapped under mudslide, Chief Minister eknath shinde rushed to spot,

प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.