पाच मजली इमारत कोसळली, काही जण इमारतीखाली अडकले, मुंबईतील दुर्घटना | five-storey building collapsed in Mumbai, some people got stuck under building, accident in Mumbai

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । मुंबईत आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत अनेक जण इमारती खाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Building Collapsed In Mumbai )

घटनास्थळी पाच फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन आणि 6 रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य (Rescue Operation) युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर परिसरात घडली आहे. (5 Storey Building Collapsed in Mumbai)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर (Behram Nagar Bandra (East) Mumbai) परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 6 जणांना (People In Collapsed Building ) बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

चौघा जणांना व्ही. एन. देसाई (N V Desai Hospital) तर, दोघा जणांना बांद्रा येथील भाभा रुग्णालयात (Bhabha Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असून, ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकले आहे का ? याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. (Search Operation )